शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंश झालेल्या चार वर्षांच्या मुली पाठोपाठ मावशीचेही निधन; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:36 IST

खंबाळपाडा परिसरातील चार वर्षांच्या मुलीला आणि तिच्या मावशीला सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. तर तिच्यापाठोपाठ मावशीचाही मंगळवारी मृत्यू झाला.

कल्याण : खंबाळपाडा परिसरातील चार वर्षांच्या मुलीला आणि तिच्या मावशीला सर्पदंश झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. तर तिच्यापाठोपाठ मावशीचाही मंगळवारी मृत्यू झाला. यामुळे तिच्या नातेवाइकांनी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या आरोग्य विभागात धडक देऊन मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. दोघांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी लावून धरली.  खंबाळपाडा परिसरात राहणारी प्राणवी भोईर (४) या चार वर्षाच्या मुलीला साप चावला. तिला नेमके काय झाले आहे हे सांगता येत नव्हते.

मात्र, तिची मावशी श्रुती ठाकूर (३४) हिलाही सर्पदंश झाल्याने  घरच्यांना प्राणवीलाही सर्पदंश झाल्याचे कळले. दोघींनाही तात्काळ शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. मुलीला सर्पदंश वरील लस देण्यात आली होती. मात्र तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी अन्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, दुसऱ्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच तीने प्राण सोडले. तिच्या मावशीला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. 

मात्र, तिचीही प्रकृती बिघडत गेली आणि उपचादारम्यान तीदेखील दगावली. त्यानंतर संतप्त नातेवाईक सत्यवान म्हात्रे, रवी बनसोडे आणि भाऊ पाटील यांनी पालिकेच्या आरोग्य विभागात घाव घेतली. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांच्या दालनात ठिय्या आंदाेलन करुन मुलगी आणि मावशीच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

कारवाईचे लेखी आश्वासनजोपर्यंत कारवाईचे लेखी आश्वासन दिले जात नाही. ताेपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा नातेवाइकांनी दिला. अखेर मुख्य वैद्यकीय अधिकारी शुक्ल यांनी कारवाईचे लेखी आश्वासन दिल्यनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, लेखी आश्वासनानंतरही कारवाई झाली नाही तर शास्त्रीनगर रुग्णालयासह पालिका मुख्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला देण्यात आला आहे.  

श्रुतीचे पुढील महिन्यात होते लग्नश्रुती ठाकूर हिचे पुढील महिन्यात लग्न होणार होते. तिच्या लग्नाची तयारी सुरु होती. तिचा मृत्यू झाल्याने ठाकूर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

स्मशानभूमीतील कर्मचारी दारूच्या नशेतश्रुती ठाकूर हिचा मृतदेह तिच्या नातेवाइकांनी खंबाळपाडा स्मशानभूमीत नेला असता त्याठिकाणी कामावर असलेला कर्मचारी हा दारुच्या नशेत होता. त्याचा व्हिडीओ ही ठाकूर हिच्या नातेवाइकांनी प्रशासनाला सादर केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Snakebite Kills Girl and Aunt; Chaos Erupts in Kalyan.

Web Summary : A four-year-old girl and her aunt died after a snakebite in Khambalpada. Relatives protested at Kalyan-Dombivli Municipal Corporation, demanding action. The aunt was to be married next month. A drunk crematorium worker added to the distress.
टॅग्स :snakeसापAccidentअपघातDeathमृत्यू