शहरं
Join us  
Trending Stories
1
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
2
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
3
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
4
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
5
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
6
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
7
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
8
Pakistan Petrol Diesel Price Cut: पाकिस्तानात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त! एवढ्या रुपयांनी घटले दर; जाणून घ्या इंधनाचे नवे भाव
9
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
10
गजलक्ष्मी-गजकेसरी योगात अधिक मास २०२६: ९ राशींचे कल्याण-मंगल, पद-पैसा वाढ; महिनाभर अपार लाभ!
11
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
12
NHAI मध्ये उपव्यवस्थापक पदांची भरती; १ लाख ७७ हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या पात्रता
13
अरे देवा! साता जन्माची साथ १६ दिवसांत सुटली; नवरी ७२ हजार आणि सोन्याचे दागिने घेऊन पळाली
14
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या 'अरबी'ला इंग्रजीत काय म्हणतात? ९०% लोक देतात याचे चुकीचे उत्तर! तुम्हाला माहितीये?
15
हा ब्लश नाही, महिलांना होणारा गंभीर आजार आहे; लुपस विकार ज्याने गर्भपातही होऊ शकतो
16
बालेन शाह सरकारला नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका! पंतप्रधानांनाचा 'तो' मनमानी निर्णय रद्द
17
अंदमानमध्ये फक्त ₹१, तर तेलंगणात ₹३५; पेट्रोल-डिझेलवर कोणत्या राज्यात किती कर लागतो? जाणून घ्या...
18
दरमहा २००० रुपयांच्या गुंतवणूकीवर रिटायरमेंटच्या वेळी मिळतील १.०८ कोटी; व्याजही फिक्स, कोणती आहे स्कीम?
19
बापरे! सुनेला सोन्याचे दागिने देण्यासाठी सासूने ओलांडली मर्यादा; घरमालकाच्या तिजोरीवर मारला डल्ला
20
कल्याणच्या वसार गावात कचरा गाडीच्या खाली सापडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

७० लाखांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी डॉ. प्रसाद साळीचा जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 17:22 IST

७० लाखांच्या फसवणूक प्रकरणी आरोपी डॉ. प्रसाद साळी याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण : ७० लाखांच्या फसवणूक प्रकरणी आरोपी डॉ. प्रसाद साळी याच्या विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साळी यांनी कल्याण जिल्हा न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज शुक्रवारी न्यायालायने फेटाळून लावला आहे.

खडकपाडा परिसरात राहणारे डॉ. राहूल दुबे यांनी २०२४ साली रुग्णालयात मेडिकल स्टोअर काढण्यासाठी डॉ. साळीला ७० लाख रुपये दिले होते. डॉ. साळीने मेडिकल स्टोअर न काढता दिलेली रक्कम डॉ. दुबे यांना परत करता परस्पर वैयक्तिक कामासाठी वापरली. मेडिकल स्टोअरचे काम न झाल्याने डॉ. दुबे यांनी त्यांचे पैसे परत करण्याची मागणी केली. त्याच्याकडून याबाबत कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने डॉ. दुबे यांनी खडकपाडा पोलीस ठाणे गाठले.

खडकपाडा पोलिसांनी डॉ. साळीच्या विरोधात ७० लाख रुपये फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी डॉ. साळी यांना पोलिसांनी २३ मार्चला अटक केली. अटकेनंतर साळीला ८ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. पोलीस कोठडी संपुष्टात आल्यावर त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडी केली. दरम्यान साली खालच्या न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्याचा अर्ज न्यायालने फेटाळल्यावर पुन्हा कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला हाेता.

अर्जावर शुक्रवारी सुनावणी झाली असता न्यायालयाने अर्ज फेटाळून लावला आहे. या फसवणूक प्रकरणी साळीची पत्नी वैशाली या देखील सह आरोपी आहेत. त्यांना अद्याप अटक झालेली नाही. वैशाली यांनी अटकपूर्व जामीनासाठी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला असल्याची माहिती फिर्यादीचे वकील हरीष नायर यांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bail plea of Dr. Prasad Sali, accused of fraud, rejected.

Web Summary : Dr. Prasad Sali's bail application in a 70 lakh fraud case was rejected by the Kalyan court. He is accused of misappropriating funds given by Dr. Rahul Dubey for a medical store. Sali's wife is also implicated; her pre-arrest bail was denied, but she received temporary relief from the High Court.
टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयdombivaliडोंबिवली