शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण-डोंबिवलीत 86 टक्के कोरोना लसीकरण पूर्ण; सोशल डिस्टन्सिंगचे केले पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 23:02 IST

सोशल डिस्टन्सिंगचे केले पालन : लस घेतल्यानंतर झाला नाही त्रास

मुरलीधर भवारकल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोनाची लस उपलब्ध होताच सहा ठिकाणी असलेल्या आठ लसीकरण केंद्रातून पहिल्या टप्प्यातील ९६ टक्के लसीकरण पूर्ण केले. दुसऱ्या टप्प्यातील  ५५ टक्के लसीकरण पार पडले असून दोन्ही टप्प्यातील एकूण लसीकरण ८६ टक्के झाले आहे. . 

लसीकरण सुरु झाल्यावर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि नर्स यांना लस दिली जाणार होती. त्यासाठी सरकारी रुग्णालये आणि खाजगी रुग्णालयांकडून माहिती मागवून लाभार्थीची ऑनलाइन यादी तयार करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी असलेल्या लाभार्थ्यांची संख्या ९ हजार ७५ होती.  त्यापैकी ८ हजार ७२२ जणांनी लस घेतली. त्यामुळे एकूण ९६ टक्के लसीकरणाचे पूर्ण झाले.

पहिल्या टप्प्यात लस घेतलेल्यांनी दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यायचा असल्याने १ हजार २५३ जणांनी लस घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईनवर वर्कर्सचे लसीकरण सुरु झाले. त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ६ हजार ८४१ होती. त्यापैकी ३ हजार ७८२ जणांनी लस घेतली. दुसऱ्या टप्प्यात ५६ टक्के लसीकरणाचे काम पार पडले आहे. 

महापालिकेस सरकारकडून लसीचे २१ हजार  डोस प्राप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्रमाण कमी होत असताना आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी स्वत: लस घेऊन लसीकरणाला प्रोत्साहन दिले. त्यानंतर लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे.     - डॉ. प्रतिभा पानपाटील,वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणCorona vaccineकोरोनाची लस