शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी हद्दीत अवघ्या २२ दिवसांत ६,६७६ रुग्ण; सोमवारी सापडले तब्बल ६८६ नवे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 00:12 IST

आतापर्यंतची सर्वोच्च रुग्णसंख्या, केडीएमसीच्या हद्दीत पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. ८ जूनपर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णांची संख्या एक हजार ५६२ इतकी होती

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवारी तब्बल ६८६ नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वोच्च रुग्णसंख्या असून, याआधी १२ जुलैला सर्वाधिक ६६१ रुग्ण आढळले होते. सोमवारी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर २४ तासांत ४२३ रुग्णांना उपचाराअंति बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने सद्य:स्थितीला पाच हजार १५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या २२ दिवसांत सहा हजार ६७६ रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

केडीएमसीच्या हद्दीत पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. ८ जूनपर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णांची संख्या एक हजार ५६२ इतकी होती, तर यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. परंतु, आजमितीला कोरोनाबाधितांचा आकडा ७१ हजार १५५ पर्यंत पोहोचला आहे. यातील ६४  हजार ८७७  रुग्ण उपचाराअंति बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्व भागात रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत असून, सोमवारी अनुक्रमे तब्बल २२६ आणि २३५ रुग्ण आढळले आहेत. डोंबिवली पश्चिमेतही ९७, तर कल्याण पूर्वेत ८७ नवे रुग्ण सापडले आहेत, तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ८० ते ८५ टक्के रुग्ण हे लक्षणेविरहित आहेत. 

जून महिन्याचा रेकॉर्ड तोडला८ जून २०२०पासून लॉकडाऊन संपुष्टात येऊन अनलॉक सुरू झाले. १ जून ते ३० जून कालावधीत नवे पाच हजार ५४२ रुग्ण आढळून आले होते. जून महिन्यातील रुग्णसंख्येला पाठीमागे टाकून मार्च महिन्यातील २२ दिवसांत रुग्णांचा आकडा सहा हजार ६७६ वर पोहोचला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर सुरूच असून, कोरोनाच्या वाढलेल्या संक्रमणाला नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या