तब्बल चार महिन्यांपासून महिलेच्या बेडखाली राहत होता, स्वत: तिनेच सांगितला हा अजब किस्सा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 13:16 IST2024-05-24T13:16:02+5:302024-05-24T13:16:28+5:30

महिलेने सांगितलं की, पोलिसांनी जेव्हा त्याची गवत कापण्याची मशीन चेक केली तेव्हा त्यात इतर काही महिलांच्या आणि के च्या अंडरविअरही त्यात सापडल्या.

Woman found man hiding under her bed he lives in her home for 4 months | तब्बल चार महिन्यांपासून महिलेच्या बेडखाली राहत होता, स्वत: तिनेच सांगितला हा अजब किस्सा...

तब्बल चार महिन्यांपासून महिलेच्या बेडखाली राहत होता, स्वत: तिनेच सांगितला हा अजब किस्सा...

काही दिवसांआधीच अमेरिकेतील एक बेघर महिला एका शॉपच्या साइन बोर्डच्या आत वर्षभर राहत होत असल्याचा खुलासा झाला होता. हे तरी ठीक होतं की, ही महिला एकटीच इतके दिवस तिथे राहत होती. पण आता एका महिलेने असा काही दावा केलाय की, वाचून लोक हैराण झाले आहेत. महिलेचा दावा आहे की, एक व्यक्ती तिच्या बेडरूममध्ये लपून होती. तेही एक वा दोन दिवसांपासून नाही तर तब्बल चार महिन्यांपासून. टिकटॉकवर महिलेने दोन व्हिडीओच्या माध्यमातून तिच्यासोबतची ही घटना सांगितली आहे.

के नावाने टिकटॉकवर फेमस असलेल्या या महिलेने सांगितलं की, २६ वर्षाची असताना तिने तिचं घर घेतलं होतं आणि आपल्या दोन मुलांसोबत तिथे राहत होती. महिलेने हेही सांगितलं की, ती कधी कधी तिच्या आई-वडिलांच्या घरीही मुक्कामी जात होती. 

त्यामुळे के आणि तिची मुलेही दिवसातून ११ ते १२ तास घरातून बाहेर राहत होते. पण एक दिवस आपल्या आई-वडिलांच्या घरी एक रात्र राहून आल्यावर सकाळी ९ वाजता ती घरी परत आली. तेव्हा तिला दिसलं की, एक व्यक्ती तिच्या बेडखाली झोपली आहे.

महिलेने सांगितलं की, ती घरी आल्यावर कपडे बदलून बेडवर लेटली. तेव्हा तिला कशाचातरी आवाज आला. तिला वाटलं बेडखाली उंदीर वगैरे असेल. तिने बेडखाली पाहिलं तर तिला निळी जीन्स आणि काळे सॉक्स घातलेले पाय दिसले. ती जोरात ओरडली आणि बाहेर गेली. ती कारमध्ये बसली आणि तिने पोलिसांना फोन केला. जेव्हा ती फोनवर बोलत होती तेव्हा ती व्यक्ती घरातून बाहेर येताना दिसली. ही व्यक्ती तिच होती ज्याला तिने लॉनमधील गवत कापण्यासाठी ठेवलं होतं. त्याने त्याचे शूज घातले आणि रस्त्याने चालत गेला. 

के ने सांगितलं की, जेव्हा पोलीस आल्यावर तिने घरात जाऊन पाहिलं तेव्हा काही वापरलेली भांडी पडली होती आणि काही वस्तू गायब होत्या. त्यावरून हे समजलं की, ती व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून घरात राहत होती. पोलिसांनी त्याला पकडल्यावर त्याने मान्य केलं की, तो चार महिन्यांपासून महिलेच्या घरात राहत होता. जेव्हा महिला घरात राहत नव्हती तेव्हा तेव्हा तो घरात शिरत होता. तो बाथरूम वापरत होता, टीव्ही बघत होता आणि जेवणही करत होता.

महिलेने सांगितलं की, पोलिसांनी जेव्हा त्याची गवत कापण्याची मशीन चेक केली तेव्हा त्यात इतर काही महिलांच्या आणि के च्या अंडरविअरही त्यात सापडल्या. टिकटॉकवर के च्या व्हिडीओला १.२ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोक कमेंट करून तिला विचारत आहेत की, पुढे काय झालं?

Web Title: Woman found man hiding under her bed he lives in her home for 4 months