रेल्वे ट्रॅकच्या मधे V शेप ट्रॅक का लावलेला असतो? पाहिला तर अनेकदा असेल पण त्यांचं काम माहीत नसेल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 15:10 IST2026-05-07T15:10:13+5:302026-05-07T15:10:53+5:30
Railway Interesting Facts : दोन मुख्य रेल्वे ट्रॅकच्या मधे हा V शेप असलेला ट्रॅक का असतो? त्याचं नेमकं काम काय असतं? असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर याचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

रेल्वे ट्रॅकच्या मधे V शेप ट्रॅक का लावलेला असतो? पाहिला तर अनेकदा असेल पण त्यांचं काम माहीत नसेल...
Railway Interesting Facts : रेल्वेने आपण अनेक प्रवास केला असेलच, अनेकदा रेल्वेचे ट्रॅकही पाहिले असतील. अनेकदा दोन ट्रॅकच्या मधे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीही बघायला मिळतात. ज्याबाबत अनेकांना प्रश्न पडतात. आपणही पाहिलं असेल की, रेल्वेच्या दोन ट्रॅकच्या मधे एक V शेप असलेला ट्रॅक सु्द्धा असतो. पण दोन मुख्य रेल्वे ट्रॅकच्या मधे हा V शेप असलेला ट्रॅक का असतो? त्याचं नेमकं काम काय असतं? असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर याचं उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
आपल्याला कदाचित माहीत असेलच की, भारताचं रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथं आणि आशियातील सगळ्यात मोठं रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वे व्यवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. कोट्यावधी लोक रोज रेल्वेने प्रवास करत आपल्या ठिकाणावर पोहोचतात. रेल्वेचा प्रवास सगळ्यात स्वस्त आणि आरामदायक ठरतो. त्यामुळे याच प्रवासाला लोक अधिक प्राधान्य देतात.आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल आणि ट्रॅकवर V शेप असलेले ट्रॅक पाहिले असतील. रेल्वे ट्रॅकच्या मधे एक V शेप ट्रॅक असतो. सामान्यपणे हे वेगळ्या शेपचे ट्रॅक मुख्यपणे अवघड वळणावर, लेव्हल क्रॉसिंगवर आणि पुलांवर लावलेले असतात.
काय असतं त्यांचं काम?
अवघड वळणांवरून रेल्वे ट्रॅकवरून खाली उतरण्यापासून वाचवण्यासाठी आणि अपघात टाळण्याची हे V शेपमधील ट्रॅक लावलेले असतात. या V शेप ट्रॅक्सना गार्ड रेल म्हटलं जातं आणि हे दोन ट्रॅकमधील जागा मजबूत करण्याचं काम करतात. यांचा वापर मुख्यपणे तीन ठिकाणांवर केला जातो. हे मु्ख्यपणे अवघड वळण, लेव्हल क्रॉसिंग आणि पुलांवर लावले जातात. या ट्रॅक्समुळे मुख्य ट्रॅक्सना जमिनीपेक्षा जास्त आधार मिळत नाही. त्यामुळे ट्रॅक सरकू नये किंवा आपली जागा सोडू नये म्हणून हे V शेप ट्रॅक लावले जातात.
याचा उपयोग कशासाठी होतो?
नियंत्रण सुटलेले डबे मुख्य ट्रॅकवर येऊ नयेत
अपघात टाळण्यासाठी ट्रेनला दुसऱ्या दिशेला वळवणे
स्टेशन किंवा यार्डमध्ये सुरक्षितता वाढवणे
दोन ट्रॅक वेगळे किंवा जोडण्यासाठी मार्गदर्शक रचना तयार करणे