गायीमध्ये तयार होणाऱ्या स्टोनसाठी लावली जाते लाखो रूपयांची बोली, कुठे तर सोन्यापेक्षाही महाग...कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 14:47 IST2026-03-14T14:46:26+5:302026-03-14T14:47:38+5:30
What is Cow Bezoar : गायीमध्ये हे स्टोन फार रेअर केसमध्ये तयार होतात. प्रत्येक गायीत ते तयार होत नाहीत. हेच महत्वाचं कारण आहे की, गायीच्या या स्टोनला लाखो रूपये किंमत मिळते.

गायीमध्ये तयार होणाऱ्या स्टोनसाठी लावली जाते लाखो रूपयांची बोली, कुठे तर सोन्यापेक्षाही महाग...कारण
What is Cow Bezoar : जगभरातील प्राण्यांबाबत नेहमीच नवनवीन गोष्टी समोर येतात. ज्या आपल्या विचारांच्या खूप पलिकडच्या असतात आणि अचंबित करणाऱ्या असतात. अशीच एक गोष्ट म्हणजे गायीच्या पोटात तयार होणारे स्टोन. ज्याना Bezoar Stone म्हणतात. गायीमध्ये हे स्टोन फार रेअर केसमध्ये तयार होतात. प्रत्येक गायीत ते तयार होत नाहीत. हेच महत्वाचं कारण आहे की, गायीच्या या स्टोनला लाखो रूपये किंमत मिळते. काही देशांमध्ये पारंपारिक औषधे आणि सजावटीच्या गोष्टींमध्ये यांचा वापर होत असल्याने याची मागणी मोठी असते. त्यामुळे जेव्हाही एखाद्या गायीमध्ये स्टोन असल्याचं समोर येतं, तेव्हा लगेच लोक ती घेण्याकडे धाव घेतात.
औषधांसाठी स्टोनचा वापर
Skyvetpharm.com या वेबसाइटनुसार, गायीच्या पोटात किंवा पचन तंत्रात कधी कधी एक कठोर गोल दगडासारखी गोष्ट तयार होते. ज्याला Cow Bezoar किंवा Bezoar Stone म्हटलं जातं. हा स्टोन अनेक वर्षात हळूहळू तयार होतो आणि याला फार दुर्मिळ मानलं जातं. त्यामुळे काही देश यासाठी मोठी रक्कम मोजतात. पूर्वी काही पारंपारिक चिकित्सेमध्ये यांचा वापर करत होते. सोबतच काही लोक यांचा वापर सजावटीच्या गोष्टींमध्ये करतात. म्हणून यांना मोठी मागणी आहे.
गायीच्या पोटात कसा तयार होतो स्टोन?
जेव्हा गाय काही खाते तेव्हा कधी कधी बाहेरचे छोटे पदार्थही पोटात जातात. जसे की, केस, झुडपं किंवा इतर काही कण. काळानुसार या गोष्टी पोटात जमा होतात आणि त्यांवर खनिज पदार्थांचा थर जमा होत राहतो. हळूहळू हा थर एका गोल कठोर दगडाचं रूप घेतो. यात कॅल्शिअम फॉस्फेट आणि कॅल्शिअम कार्बोनेट सारखे खनिज असतात.
किंमती कशावर ठरते?
गायीच्या स्टोनची किंमत ही वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. जसे की, रंग सोनेरी किंवा जास्त भुरका असेल तर किंमत जास्त मिळते. स्टोन जास्त चमकदार असेल तर जास्त किंमत मिळते. तसेच आकार मोठा असेल तर किंमत आणखी वाढते. जे स्टोन गोल असतात त्यांना अधिक चांगल्या गुणवत्तेचे मानले जातात.
किती मिळते किंमत?
गायीच्या स्टोनची किंमत साधारण 3,000 ते 50,000 प्रति ग्रॅम किंवा त्याहून जास्त असू शकते, पण ती पूर्णपणे गुणवत्ता, आकार आणि बाजारातील मागणीवर अवलंबून असते. काही आंतरराष्ट्रीय बाजारात याचा दर 2,700 ते 3,100 रूपये प्रति ग्रॅम इतकाही सांगितला जातो.