शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

बाप रे बाप! देशातील 'या' एकाच स्टेशनवर आहेत तब्बल २३ प्लॅटफॉर्म, इतकं मोठं की फिरायला लागेल अख्खा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:57 IST

Railway Interesting Facts: सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं रेल्वे स्टेशन सगळ्यात मोठं किंवा जास्त प्लॅटफॉर्म असलेलं स्टेशन असेल. पण असं नाहीये.

Railway Interesting Facts: भारतीय रेल्वे ज्या पद्धतीने कात टाकत आहे ते जगभरातील लोक बघत आहेत. नवीन रेल्वे, नवीन मार्ग आणि नवीन सुविधांसाठी रेल्वे वेगवेगळ्या स्तरांवर काम करत आहे. नवीन स्टेशन आणि प्लॅटफॉर्मची कामे सुरू आहेत. जुन्या प्लॅटफॉर्मचा चेहरामोहरा बदलला जात आहे. सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन हे सगळ्यात मोठं किंवा जास्त प्लॅटफॉर्म असलेलं स्टेशन असेल. पण असं नाहीये. नंतर काहींना वाटतं की, दिल्लीला सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म असतील. पण असंही नाहीये. आज आम्ही आपल्याला सांगू की, देशातील कोणत्या रेल्वे स्टेशनवर सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म आहेत.

भारतातील सगळ्यात वेगळं रेल्वे स्टेशन

भारतातील एक रेल्वे स्टेशन सगळ्यात अनोखं आहे. या एकाच रेल्वे स्टेशनवर तब्बल २३ प्लॅटफॉर्म आहेत आणि याचं क्षेत्रफळही फार जास्त आहे. इतकंच नाही तर हे रेल्वे स्टेशन सगळ्यात जुनं, बिझी आणि सगळ्यात मोठं आहे. हे रेल्वे स्टेशन तब्बल ६० ते ७० एकर परिसरात पसरलं आहे. १८५४ मध्ये सुरू झालेलं हे रेल्वे स्टेशन ऐतिहासिक लाल विटांसाठीही प्रसिद्ध आहे. 

२३ प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन

देशातील सगळ्यात जास्त प्लॅटफॉर्म असलेलं रेल्वे स्टेशन म्हणजे कोलकातामधील हावडा जंक्शन. हे एकुलतं एक असं स्टेशन आहे जिथे तब्बल २३ प्लॅटफॉर्म आहेत.

दोन प्लॅटफॉर्मच्या मधे रोड

हावडा जंक्शन हे असं रेल्वे आहे, जिथे दोन प्लॅटफॉर्मच्या मधे एक रस्ता आहे. ज्यावरून लोक आपल्या वाहनांनी ये-जा करतात, गाडी पार्क करतात आणि मग तिथूनच रेल्वे पकडतात. हावडा जंक्शनच्या ८ आणि ९ तसेच २१ आणि २२ नंबरच्या प्लॅटफॉर्म मधे आपल्याला हे रस्ते बघायला मिळतात.

दोन राज्यात वाटलेलं रेल्वे स्टेशन?

देशात कितीतरी रेल्वे स्टेशन आहेत. पण देशात एक असंही रेल्वे स्टेशन आहे, जे दोन देशात विभागलेलं आहे. म्हणजे ते अर्ध दुसऱ्या राज्यात आणि अर्ध वेगळ्या राज्यात आहे. या रेल्वे स्टेशनचं नाव आहे नवापुर रेल्वे स्टेशन. हेच ते रेल्वे स्टेशन आहे जे दोन राज्यात म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विभागलं गेलं आहे. या रेल्वे स्टेशनचा अर्धा भाग महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहे, उरलेला अर्धा भाग गुजरातच्या तापीमध्ये आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Howrah Junction: India's largest railway station with 23 platforms.

Web Summary : Kolkata's Howrah Junction is India's largest railway station, boasting 23 platforms spread across 60-70 acres. Notably, roads run between some platforms. The unique Navapur station straddles Maharashtra and Gujarat.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सIndian Railwayभारतीय रेल्वेJara hatkeजरा हटके