शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून स्टारबक्सच्या कर्मचाऱ्याला २४ लाखांची टीप; उत्तम कामगिरीचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 07:02 IST

मास्क न घातलेल्या महिलेची ऑर्डर स्वीकारली नाही

सॅन दिएगो : अमेरिकेतील सॅन दिएगो शहरात स्टारबक्सच्या कॉफीशॉपमधील लेनिन गुटेरेझ या कर्मचाऱ्याने मास्क न घातलेल्या एका महिलेची कॉफीची ऑर्डर स्वीकारण्यास नकार दिला. या त्याच्या कामगिरीवर खूष होऊन फेसबुकवरील सदस्यांनी त्याला ३२ हजार डॉलरची टीप देऊ केली आहे.

सॅन दिएगो येथील स्टारबक्सच्या कॉफीशॉपमध्ये अ‍ॅम्बर लिन गिल्स ही महिला मास्क न घालता गेली होती. त्यामुळे तिची कॉफीची ऑर्डर लेनिन गुटेरेझने घेतली नाही. यामुळे संतापलेल्या अ‍ॅम्बरने हा सारा प्रकार फेसबुकवर एका पोस्टमध्ये लिहिला. त्यामध्ये लेनिनवर सडकून टीका करण्यात आली होती.फेसबुकवर ही पोस्ट झळकताच अ‍ॅम्बरला अपेक्षित होते त्याहून वेगळेच काही घडले. ही पोस्ट वाचून फेसबुकवरील सदस्यांनी अ‍ॅम्बरवरच टीकेची झोड उठविली. लेनिन गुटेरेझने आपले कर्तव्य योग्य पद्धतीने बजावले आहे अशीही प्रतिक्रिया असंख्य नेटकऱ्यांनी फेसबुकवरील या पोस्टखाली व्यक्त केली. उत्तम कामगिरीची बक्षिसी म्हणून फेसबुकवरील सदस्यांनी लेनिनला ३२ हजार डॉलरची टीप देऊ केली.५० हजार लोकांनी शेअर केली पोस्टमास्क न घातल्याबद्दल माझी ऑर्डर लेनिन गुटेरेझने घेतली नाही. पुढच्या वेळेला मी स्टारबक्सच्या कॉफीशॉपमध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन जाणार आहे व वेळप्रसंगी पोलिसांची मदत घेणार आहे असे अ‍ॅम्बर लिन गिल्स या महिलेने लिहिले होते. त्याबद्दलही फेसबुक सदस्यांनी तिला धारेवर धरले. या पोस्टवर एक लाख लोकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, ५० हजार लोकांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

टॅग्स :Facebookफेसबुकcorona virusकोरोना वायरस बातम्या