‘शप्पू’च्या प्रतापाने आईवडीलही हादरले!

By Admin | Updated: May 7, 2014 07:33 IST2014-05-07T03:33:51+5:302014-05-07T07:33:36+5:30

सिद्धार्थनगर परिसरात छोट्याशा चार खोल्या. घरात आई, वडील, मोठा भाऊ आणि वहिनी असा परिवाऱ वडिलांनी भाजीपाला विकून शप्पूचे (प्रदीप कोकाटे) शिक्षण केले़

Shapoo's parents shook their parents! | ‘शप्पू’च्या प्रतापाने आईवडीलही हादरले!

‘शप्पू’च्या प्रतापाने आईवडीलही हादरले!

भाटिया खून प्रकरण : भाजीवाल्याचा मुलगा बनला मारेकरी

अहमदनगर : सिद्धार्थनगर परिसरात छोट्याशा चार खोल्या. घरात आई, वडील, मोठा भाऊ आणि वहिनी असा परिवाऱ वडिलांनी भाजीपाला विकून शप्पूचे (प्रदीप कोकाटे) शिक्षण केले़ वाणिज्य शाखेत शिकणारा शप्पू सोबऱ मोबाईल, कम्प्युटर आणि टीव्ही ही त्याची जगण्याची साधने़ त्याला कुठलेही व्यसन नाही, असा हा शप्पू हत्यारा कसा बनला़ तो बाईच्या नादाला लागला असेल, याची पुसटशी कल्पना त्यांना नव्हती़ नागापूर औद्योगिक वसाहतीत कामगार म्हणून जनार्धन कोकाटे काम करीत होते़ परंतु ही कंपनी बंद पडली़ आई भाजी विक्रीचा व्यवसाय करत होती़ घरात सगळेच कमावते असल्याने सर्वकाही सुरळीत़ प्रदीप घरात सर्वात लहाऩ त्यामुळे सर्वांचाच लाडका़ रेसिडेन्शियल शाळेत त्याचे शिक्षण झाले़ त्यानंतर न्यू आर्टस महाविद्यालयात त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतलेला़ पण दुसर्‍या वर्षात एका विषयात तो नापास झाला़ तिसर्‍या वर्षातही एका विषयात नापास झाला़ हा विषय सोडविण्यासाठी शप्पूने प्रयत्न केले़ परंतु विषय सुटला नाही़ त्यामुळे शप्पूवर घरी बसण्याची वेळ आली़ म्हणून आधारकार्डचे काम सुरू केले़ तेही नंतर सोडले़ त्यामुळे तो दिवसभर घरी असायचा आणि तोही स्वतंत्रखोलीत़ संगणक, टीव्ही, व्यायामाचे साहित्य अशी त्याची खोली़ कधी घरी येतो अन् कधी बाहेर जातो, याच्याशी घरच्यांचा संबंध नव्हता़ तो बाहेर काय करतो, याची आईवडिलांना कल्पना नव्हती़ घरात पिस्तूल कधी आणून ठेवलेते समजले नाही, असे वडिलांनी सांगितले़ (प्रतिनिधी) च्व्यापारी जितेंद्र भाटियाची प्रदीपने गोळ्या घालून हत्या केली़ भाटियाची पत्नी दिव्या ऊर्फ हेमाने प्रदीपच्या हाताने जितूचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले़ ज्या दिवशी पोलिसांनी पकडले त्या दिवशी त्याने केस कमी करण्यासाठी पैसे घेतले़ केस कमी करून आला आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी पकडले़ या सर्व प्रकाराबाबत त्याचे आईवडिल मात्र अनभिज्ञ होते़ शप्पू टेन्शन फ्री : पोलिसांनी शप्पूला पकडले परंतु त्याला त्याचे काहीच वाटले नाही़ त्याने कुलरमध्ये लपवून ठेवलेले पिस्तूल काढून दिले़ ते पिस्तूल कुठून आणले तेही त्याने पोलिसांना सांगितले़ पोलीस त्याला घेऊन दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरी आले होते़ तो पोलिसांसोबत घरी आला, त्यावेळी त्याच्या चेहर्‍यावर कसलेही टेन्शन नसल्याचे जाणवले़

Web Title: Shapoo's parents shook their parents!