13 वर्षांची असताना आई झाली होती ही मुलगी, आता इन्स्टाग्रामने बदललं तिचं आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 13:52 IST2021-03-23T13:51:28+5:302021-03-23T13:52:58+5:30

गेल्यावर्षी तिने एक दावा केला होता की, तिचा बॉयफ्रेन्ड इवान याने तिला प्रेग्नेंट केलं. इतकेच नाही तर  तिच्या बॉयफ्रेन्डचं वय त्यावेळी १० वर्षे होतं.

Meet this girl who were pregnant at 13 now famous celebs in Russia | 13 वर्षांची असताना आई झाली होती ही मुलगी, आता इन्स्टाग्रामने बदललं तिचं आयुष्य!

13 वर्षांची असताना आई झाली होती ही मुलगी, आता इन्स्टाग्रामने बदललं तिचं आयुष्य!

काही दिवसांपूर्वी रशियातील एक १३ वर्षांची मुलगी चांगलीच वादात सापडली होती. तिचं नाव दार्या सुदनिश्र्नीकोवा आहे. गेल्यावर्षी तिने एक दावा केला होता की, तिचा बॉयफ्रेन्ड इवान याने तिला प्रेग्नेंट केलं. इतकेच नाही तर  तिच्या बॉयफ्रेन्डचं वय त्यावेळी १० वर्षे होतं. सर्वांनाच धक्का बसला होता की, असं कसं होऊ शकतं. अनेक तज्ज्ञांनी  या मुलाचं वय बघता मुलीचा दावा खोटा असल्याचं  सांगितलं होतं.

त्यानंतर या मुलीने सत्य काय ते सांगितलं होतं. द मिररच्या वृत्तानुसार, दार्याने नंतर खरं सांगितलं. तिने सांगितले की, तिचं त्या १० वर्षाच्या मुलासोबत कोणतंही नातं नव्हतं. ती दुसऱ्या व्यक्तीमुळेच प्रेग्नेंट झाली होती. पण हे कसं सांगावं हे तिला अवघड वाटत होतं. म्हणून ती खोटं बोलली होती.

हे प्रकरण समोर आल्यावर दार्याची सोशल मीडियावर फार चर्चा झाली होती. सध्या ती १४ वर्षांची आहे आणि एका मुलाची आहे आहे. तिची कहाणी जगासमोर आली तर लोक तिला इन्स्टाग्राम आणि टिकटॉकवर फॉलो करू लागले. आज तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. 

दार्या आज फार फेमस झाली आहे. ती एक सोशल मीडिया स्टार आहे. ती सांगते की, महिन्याला ती पाच हजार पाउंड म्हणजे ५ लाख रूपये कमावते. इतकेच नाही तर ती सांगते की, तिच्या आई-वडिलांच्या कमाईपेक्षाही जास्त ती कमावते.

द मिररच्या रिपोर्टनुसार, दार्या फेमस झाल्यावर सोशल मीडियावर फार लोकप्रिय झाली आहे. त्यासोबतच ती अनेक लाइव शोमध्येही आली आहे. ती प्रसिद्ध ब्रॅन्ड्स आणि स्पॉन्सर्ससोबत काम करण्यासाठीही तयार आहे. 

दार्याची आई एलेना सांगते की, त्यांना सुरूवातीला वाटलं होतं की, तिला फूड पॉयजनिंग झालं असेल. पण लवकरच त्यांना समजलं की,  त्यांची मुलगी प्रेग्नेंट आहे. एलेनाला कॅन्सर आहे. पण आता त्यांना त्यांच्या मुलीची काळजी घ्यायची आहे. तिच त्यांच्या जगण्याचं कारण आहे. 
 

Web Title: Meet this girl who were pregnant at 13 now famous celebs in Russia