"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं

By कोमल खांबे | Updated: April 25, 2026 09:11 IST2026-04-25T09:11:34+5:302026-04-25T09:11:59+5:30

'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानही कैमिओ करणार असल्याच्या चर्चा आहेत. रितेशनेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आता रितेशने एका मुलाखतीत 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खान साकारणार असलेल्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे. 

ritesh deshmukh talk about salman khan role in raja shivaji historical movie | "भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं

"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या ऐतिहासिक सिनेमाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. रितेश देशमुखच्या या सिनेमात बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानही कैमिओ करणार असल्याच्या चर्चा आहेत. रितेशनेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आता रितेशने एका मुलाखतीत 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खान साकारणार असलेल्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे. 

'राजा शिवाजी' सिनेमाच्या निमित्ताने रितेशने महाराष्ट्रा टाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीत रितेशने सिनेमातील सलमानच्या भूमिकेबाबत सांगितलं. तो म्हणाला, "खरं तर सलमान भाऊ सिनेमात आहेत. पण, ते कोणती व्यक्तिरेखा किंवा भूमिका साकारणार आहेत, ते मी आता सांगणार नाही. ३१ डिसेंबर २०२४ रोजी आमची भेट झाली होती. मी छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा करतोय, हे त्यांना माहीत होतं. त्यावेळी त्यांनी मला 'माझी भूमिका कोणती?' असं अचानक विचारलं. मी अक्षरशः निरुत्तर झालो. "तुझ्या सिनेमात तर मी असणारच", असंदेखील ते म्हणाले". 


रितेश आणि सलमान खानची मैत्री घट्ट आहे. रितेशच्या प्रत्येक सिनेमात सलमान खान कैमिओ करताना दिसतो. याआधी वेड आणि लय भारी या रितेशच्या सिनेमात सलमान खान दिसला होता. आता 'राजा शिवाजी' सिनेमात तो जिवा महालाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. पण, अद्याप त्याच्या भूमिकेबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही. 

'राजा शिवाजी' सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर जिनिलीया राणी सईबाईंच्या भूमिकेत आहे. अभिषेक बच्चन संभाजी शहाजी भोसले, विद्या बालन बडी बेगम, फरदीन खान शाहजहान, संजय दत्त अफजलखान हे बॉलिवूड करणार भूमिका साकारताना दिसणार आहेत. येत्या १ मे रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  

Web Title : 'राजा शिवाजी' में सलमान खान की एंट्री: रितेश ने बताया कैसे हुई।

Web Summary : रितेश देशमुख की 'राजा शिवाजी' में सलमान खान कैमियो करेंगे। रितेश ने बताया कि सलमान ने खुद एक मुलाकात के दौरान भूमिका मांगी थी। हालांकि, उनके किरदार की पुष्टि नहीं हुई है, अटकलें हैं कि वह जीवा महाला की भूमिका निभा सकते हैं। फिल्म 1 मई को रिलीज होगी।

Web Title : Salman Khan's entry in 'Raja Shivaji': Riteish reveals how it happened.

Web Summary : Salman Khan will appear in Riteish Deshmukh's 'Raja Shivaji'. Riteish shared that Salman himself asked for a role during a meeting. While his exact character is unconfirmed, speculations suggest he might play Jiva Mahala. The film boasts a star-studded cast and will release on May 1st.