अचानक हॉस्टेलमधून गायब होऊ लागले होते तरूणींचे अंतर्वस्त्र, कॅमेरात कैद झाला माथेफिरू चोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 03:14 PM2022-01-27T15:14:19+5:302022-01-27T15:23:05+5:30

Underwear Thief : इथे पोलिसांनी नुकतीच एका व्यक्तीला तरूणींच्या अंडरविअर चोरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली. असं सांगितलं जात आहे की, या व्यक्तीला कमी ऐकायला येतं.

Malaysia : Thief arrested from girls hostel stealing women's underwear | अचानक हॉस्टेलमधून गायब होऊ लागले होते तरूणींचे अंतर्वस्त्र, कॅमेरात कैद झाला माथेफिरू चोर

अचानक हॉस्टेलमधून गायब होऊ लागले होते तरूणींचे अंतर्वस्त्र, कॅमेरात कैद झाला माथेफिरू चोर

Next

जगातल्या अनेक लोकांना विचित्र सवयी असतात. काही लोक या सवयींमुळे असे काही वागतात की, विश्वास करणं अवघड होऊन बसतं. काही याला मानसिक रोगाचं नाव देतात तर काही मूर्खपणा म्हणतात. सोशल मीडियावर अशाच एका सनकी चोराची चर्चा सुरू आहे. याला अनेक लोक चड्डी चोर म्हणून बोलवतात. हा चोर सोनं-चांदी किंवा मौल्यवान वस्तू नाही तर तरूणींचे अंतर्वस्त्र चोरी (Underwear Thief) करतो. याचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा अनेक तरूणींच्या अंडरविअर सतत गायब होऊ लागल्या होत्या. 

मलेशियाच्या (Malaysia) टेरेंगगनुमध्ये असलेल्या एका पब्लिक यूनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमधून हैराण करणारी ही घटना समोर आली आहे. इथे पोलिसांनी नुकतीच एका व्यक्तीला तरूणींच्या अंडरविअर चोरी करण्याच्या आरोपाखाली अटक केली. असं सांगितलं जात आहे की, या व्यक्तीला कमी ऐकायला येतं. घटनेवेळी हॉस्टेलच्या परिसरात तरूणींचे कपडे वाळत घालण्याच्या ठिकाणी तो पळत दिसायचा. त्याने स्वत:ला निर्दोष सांगितलं. पण त्याला तारावरून अंडरविअर चोरी करताना त्याचा व्हिडीओ बनवण्यात आला होता. याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्यक्तीला २५ जानेवारील अटक करण्या आली. ३७ वर्षीय या आरोपीला हॉस्टेल परिसरातून सायंकाळी अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून हॉस्टेलमधील तरूणींच्या अंडरविअर चोरी होत होत्या. कुआला टेरेंगगनु डिस्ट्रिक्ट पोलीस चीफ अब्दुल रहीम यांच्यानुसार, तरूणींची समस्या आता सोडवण्यात आली आहे. व्यक्तीची तक्रार हॉस्टेलमधील तरूणींनी केली होती. तो त्यांना त्यांच्या कपड्यांजवळ फिरताना दिसला होता. त्यानंतर तरूणींनी त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. ज्यात तो तारावरून केवळ तरूणींच्या अंडरविअर चोरी करताना दिसला आहे.

आता या व्यक्तीचा ४ दिवसांसाठी रिमांडवर ठेवण्यात आलं आहे. असं सांगितलं जात आहे की, त्याला ७ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा आणि आर्थिक दंड भरावा लागू शकतो. हॉस्टेलमधून अंडरविअर चोरी करतानाचा त्याचा व्हिडीओ ऑनलाइन शेअर करण्यात आला आहे. जो आता व्हायरल झाला आहे. लोकांनी या व्यक्तीवर टिका केली आहे. अनेकजण म्हणाले की, त्याला उपचाराची गरज आहे. तर काही लोकांनी या व्यक्तीसोबत सहानुभूती दर्शवली. 

हे पण वाचा :

मुकेश अंबानींच्या घरी २ लाखांची नोकरी हवी? मग UPSC सारखी द्यावी लागेल परीक्षा
 

Web Title: Malaysia : Thief arrested from girls hostel stealing women's underwear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.