शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

'हा' आहे जगातला सर्वात लांब इंग्रजी शब्द, वाचण्यासाठी लागतो तब्बल साडे तीन तासांचा वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 15:41 IST

सामान्यपणे लोकांना जर Czechoslovakia (झेकोस्लोवाकिया) सारख्या इंग्रजी शब्दांचा उच्चार व्यवस्थित करणं कठीण होतं.

सामान्यपणे लोकांना जर Czechoslovakia (झेकोस्लोवाकिया) सारख्या इंग्रजी शब्दांचा उच्चार व्यवस्थित करणं कठीण होतं. अशात एक असाही इंग्रजी शब्द आहे ज्याचा उच्चार करायला बसलं तर हा एक शब्द वाचायला साडे तीन तासांचा वेळ लागतो, असा दावा केला जातो. आता तुम्ही असा विचार करत असाल की, असा कोणता शब्द आहे. चला तर जाणून घेऊ या शब्दाबद्दल...

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, इंग्रजीच्या सर्वात लांब शब्दात १, ८९, ८१९ अक्षरे आहेत आणि या शब्दाचा योग्य उच्चार करण्यासाठी तुम्हाला साडे तीन तासांचा वेळ लागतो. हा शब्द मनुष्याच्या शरीरात आढळणाऱ्या टिटिन नावाच्या एका प्रोटीनचं रासायनिक नाव आहे.

वैज्ञानिकांनुसार, मानवी शरीरात २० लाखांपेक्षा अधिक प्रोटीन आहे. जे अमीनो अ‍ॅसिडपासून तयार झोलेले असतात. मनुष्याच्या शरीरातील टिटिन हा एकच माहिती असलेला सर्वात लांब प्रोटीन आहे. ज्यात २६ हजारांपेक्षा अधिक अमीनो अ‍ॅसिड असतात.

आधी टिटिनच्या रासायनिक नावाला इंग्रजीच्या शब्दकोषात जागा देण्यात आली होती. पण या नावामुळे जेव्हा जागेची अडचण झाली, तेव्हा हा शब्द काढून टाकण्यात आला. आता याला केवळ टिटिन नावाने ओळखलं जातं. 

टिटिन प्रोटीनचा शोध रेजी नटोरी यांनी १९५४ मध्ये लावला होता. त्यानंतर १९७७ मध्ये कोस्सक मरूयामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून यावर शोध केला आणि या प्रोटीनचं नाव कोन्नेक्टिन असं ठेवलं. त्यानंतर दोन वर्षांनी कुआन वांग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही या प्रोटीनवर अभ्यास केला आणि याला टिटिन असं नाव दिलं.

टॅग्स :scienceविज्ञानJara hatkeजरा हटके