CV, Resume आणि Biodata ला एकच समजण्याची करू नका चूक, जाणून घ्या तिन्हीमध्ये काय असतो फरक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 12:34 IST2026-05-08T12:34:22+5:302026-05-08T12:34:54+5:30

Interesting Facts : आपण चुकीची कागदपत्रे जमा केलीत तर नोकरी लागणंही धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे या तिन्हीतील फरक आपल्याला माहीत असायला हवेत.  

Interesting Facts : Difference between CV, Resume and Biodata, you should know | CV, Resume आणि Biodata ला एकच समजण्याची करू नका चूक, जाणून घ्या तिन्हीमध्ये काय असतो फरक...

CV, Resume आणि Biodata ला एकच समजण्याची करू नका चूक, जाणून घ्या तिन्हीमध्ये काय असतो फरक...

Interesting Facts : नोकरी करायची असेल तर एखाद्या कंपनीला आपली सगळी माहिती पुरवावी लागते. जी CV, Resume आणि Biodata च्या माध्यमातून दिली जाते. पण जास्तीत जास्त लोक या तिन्ही गोष्टींना एक समजण्याची मोठी चूक करतात.  आपणही कधीना कधी नोकरीसाठी अर्ज केला असेल आणि या तिन्ही गोष्टींना एकच समजण्याची चूक केली असेल. अनेकांना हे माहितीच नसतं की, CV, Resume आणि Biodata या तिन्हीत फरक असतो. जर आपण चुकीची कागदपत्रे जमा केलीत तर नोकरी लागणंही धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे या तिन्हीतील फरक आपल्याला माहीत असायला हवेत.  

Resume काय असतो?

Resume सगळ्यात छोटा डॉक्यूमेंट असतो. हा सामान्यपणे १ ते २ पानांचा असतो. यात केवळ त्या नोकरीसाठी मुख्य स्किल्स, अनुभव, अचिव्हमेंट आणि शिक्षण हायलाइट करायचं असतं. खाजगी कंपन्यांमध्ये Resume जास्त प्रचलित आहे. याला प्रत्येक कंपनी आणि पदानुसार बदलला येतं. Resume चा मुख्य उद्देश नोकरी देणाऱ्या कंपनीचं लक्ष वेधून घेणं असतं.

CV काय असतो?

CV चा फुल फॉर्म Curriculum Vitae असतो. हे एक डिटेल डॉक्यूमेंट असतं. यात पूर्ण शैक्षणिक आणि प्रोफेशनल माहिती असते. जसे की, प्रकाशन, रिसर्च, प्रेझेंटेशन, अवॉर्ड्स, वॉलेंटिअर वर्क इत्यादी. सीव्ही सामान्यपणे २ ते १० पानांचा किंवा त्यापेक्षागी जास्त पानांचा असू शकतो. CV मध्ये फार कमी बदल केले जातात. हा साधारणपणे रिसर्च, डॉक्टर्स, प्रोफेसर्स आणि यूरोपिय देशांमध्ये जास्त वापरला जातो.

Biodata काय असतो?

Biodata मुख्यपणे भारत आणि दक्षिण आशियात प्रचलित आहे. यात व्यक्तीगत माहिती जास्त दिलेली असते. म्हणजे वय, जन्मतारीख, लिंग, वैवाहिक स्थिती, वडिलांचं नाव, धर्म, भाषा, उंची, फोटो इत्यादी. Biodata सरकारी नोकरी, बँकिंग, रेल्वे आणि खासकरून लग्न जुळवणे यासाठी वापरा जातो. 

Web Title : CV, Resume, Biodata: आवेदन करने से पहले अंतर जानें!

Web Summary : CV, Resume और Biodata को लेकर भ्रमित न हों! Resume नौकरी के लिए कौशल दिखाता है. CV शैक्षणिक और पेशेवर इतिहास का विवरण देता है. Biodata व्यक्तिगत जानकारी पर केंद्रित है, जो सरकारी नौकरियों और विवाह के लिए भारत में आम है।

Web Title : CV, Resume, Biodata: Know the Key Differences Before Applying!

Web Summary : Don't confuse CV, Resume, and Biodata! Each serves a different purpose. Resume highlights skills for specific jobs. CV details academic and professional history. Biodata focuses on personal information, common in India for government jobs and marriage.