Flying Vada Pav पाहिलाय का?; पाहा भन्नाट व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 14:16 IST2021-03-29T14:13:45+5:302021-03-29T14:16:07+5:30

पाहा कशाप्रकारे तयार केला जातोय हा वडापाव

flying vada pav video went viral on social media the unique style of the creator see | Flying Vada Pav पाहिलाय का?; पाहा भन्नाट व्हिडीओ

Flying Vada Pav पाहिलाय का?; पाहा भन्नाट व्हिडीओ

ठळक मुद्देयापूर्वी एका डोसा तयार करणाऱ्या व्यक्तीचाही व्हिडीओ झाला होता व्हायरलहा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

तुम्ही खाद्यपदार्थ तयार करण्याचे अनेक निरनिराळे प्रकार पाहिले असतील. परंतु तुम्ही कधी फ्लाईंग वडापाव पाहिलाय का? मुंबईतील स्ट्रीट फुड विक्रेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडीओ पसंतीसही पडत आहे. तुम्हीदेखील हा व्हिडीओ पाहून हैराण व्हाल. 

यापूर्वी तुम्ही फ्लाईंग डोसाबद्दल ऐकलं असंल. परंतु आता तुम्हाला फ्लाईंग वडापावही पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव विक्रेत्याचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचंच आकर्षण ठरत आहे. या व्हिडीओमध्ये ते विक्रेते हे वडा उडवून आपल्या ग्राहकांसाठी वडापाव तयार करताना दिसत आहेत. आमची मुंबईच्या युट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ प्रदर्शिक करण्यात आला आहे. 



याशिवाय या ठिकाणी त्यांची डोसा तयार करण्याचीही पद्धत सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. त्यांचं हे दुकान ६० वर्षे जुनं असल्याचं म्हटलं जात आहे.

 

Web Title: flying vada pav video went viral on social media the unique style of the creator see