शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

OMG : जगातील सर्वात विचित्र दगड पाहून तुम्हीही व्हाल थक्क; रबरासारखा बनतो लवचिक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 5:05 PM

flexible rock itacolumite : पहिल्यांदा हा दगड पाहिल्यानंतर तुम्हाला तो रबर (Rubber like Rock) किंवा कोणत्याही दोरी सारखा लवचिक वाटेल, परंतु वास्तव काही वेगळेच आहे.

बऱ्याचदा आपण कठोर मनाच्या लोकांना दगडाचे हृदय असलेली माणसे म्हणतो. दगड (Rock) हा नेहमीच कठीण किंवा ठणक असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? जगात असा एक दगड आहे जो अजिबात कठीण नाही. होय, हे खरे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका दगडाबद्दल सांगणार आहोत जो कठीण नाही पण अतिशय लवचिक (Flexible Rock) आहे. पहिल्यांदा हा दगड पाहिल्यानंतर तुम्हाला तो रबर (Rubber like Rock) किंवा कोणत्याही दोरी सारखा लवचिक वाटेल, परंतु वास्तव काही वेगळेच आहे. (flexible rock itacolumite bends like rubber)

इटाकोलुमाइट  (Itacolumite) एक प्रकारचा वाळुचा दगड आहे. या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे जर तो पट्ट्यांच्या (Strip) आकारात कापला जातो. तो खूप लवचिक बनतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तो तुटतही नाही. ज्या ठिकाणी तो पहिल्यांदा सापडला त्या ठिकाणावरून या दगडाला त्याचे नाव मिळाले. हा ब्राझीलच्या (Brazil) मिनास गेराईसमध्ये सर्वात आधी सापडला. परंतु आता तो जगातील अनेक भागांमध्ये सहजपणे आढळतो.

इटाकोलुमाइट, जॉर्जिया, अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना आणि भारतातील हरयाणाच्या कलियाना गावात देखील आढळतो. दगड बांधकामाच्या कामातही याचा वापर केला जातो. याचा आकार 1 सेंटीमीटर जाड आणि 20 सेमी लांब प्लेटमध्ये बनवला जातो आणि भिंती किंवा मजल्यांवर लावण्यासाठी देखील वापर केला जातो. पण जेव्हा तो पातळ पट्ट्यांच्या आकारात कापला जातो, तेव्हा या दगडाची खरी जादू दिसते. दगड इतका लवचिक होतो की शास्त्रज्ञ देखील त्याच्या गुणवत्तेमुळे बऱ्याच काळापासून आश्चर्यचकित झाले आहेत.

दरम्यान, जर इटाकोलुमाइटची 30 किंवा 60 सेंटीमीटर लांब पट्टी (Long Strip) कोपऱ्यांना धरून लटकवली असेल तर ती आपल्या वजनामुळे वाकेल. बरेच लोक याला जादू मानतात, परंतु ते केवळ विज्ञानामुळे होते. पूर्वी असे मानले जात होते की, हा दगड लवचिक आहे कारण त्यात अभ्रक मिसळला जातो. पण खरी गोष्ट अशी आहे की, अशी हालचाल दगडाच्या सच्छिद्रतेमुळे होते.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके