सगळीकडे पाणीच पाणी मग व्हेल समुद्राखाली आपल्या पिल्ल्याला दूध कसं पाजते? 'निसर्गाचा चमत्कार' पाहून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 13:58 IST2026-04-23T13:57:54+5:302026-04-23T13:58:52+5:30

Whale Feeding Viral Video : आता व्हेल आपल्या पिल्ल्याला समुद्राच्या खाली कसं दूध पाजत असेल? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण ते या व्हिडिओत बघायला मिळतं.

Female whale feeds baby in deep ocean, see how she feeding | सगळीकडे पाणीच पाणी मग व्हेल समुद्राखाली आपल्या पिल्ल्याला दूध कसं पाजते? 'निसर्गाचा चमत्कार' पाहून व्हाल अवाक्...

सगळीकडे पाणीच पाणी मग व्हेल समुद्राखाली आपल्या पिल्ल्याला दूध कसं पाजते? 'निसर्गाचा चमत्कार' पाहून व्हाल अवाक्...

Whale Feeding Viral Video : समुद्राखालचं जीवन हे फारच अनोखं आणि आश्चर्यकारक असतं. हे जीवन इतकं वेगळं असतं की, एखाद्या रहस्यापेक्षा जराही कमी नसतं. काही गोष्टी तर इतक्या अद्भुत असतात की, त्यांवर सहजपणे विश्वासच बसत नाही. समुद्रातील जीव-जंतू ज्या पद्धतीने जगतात, ते अवाक् करणारं आणि प्रश्नात पाडणारं असतं. सोशल मीडियावर त्यांचं वेगळेपण दाखवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांवर चर्चा देखील होते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय. ज्यात एक व्हेल आपल्याला पिल्लाला दूध पाजताना दिसत आहे. आता व्हेल आपल्या पिल्ल्याला समुद्राच्या खाली कसं दूध पाजत असेल? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण ते या व्हिडिओत बघायला मिळतं.

सामान्यपणे स्तनधारी जीवांची मुलं आपल्या आईच्या स्तनांमधून दूध खेचून पितात. पण व्हेलबाबत ही प्रक्रिया पूर्णपणे वेगळी असते. समुद्रात सगळीकडे पाणीच पाणी असतं, त्यामुळे तिथे दूध पाजणं काही सोपं काम नसतं. म्हणजे जर दूध लिक्विड असेल तर ते पाण्यात मिक्स होईल. पण निसर्गाने व्हेलला दूध पाजण्यासाठी एक वेगळीच पद्धत दिली आहे. जी बघून नक्कीच थक्क व्हायला होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून लोक निसर्गाची कमाल बघून थक्क झाले आहेत.


व्हेल कसं पाजते दूध?

मादी व्हेल आपल्या पिल्यांना दूध पाजण्यासाठी आपल्या शरीरातून मोठ्या दबावाने दूध बाहेर काढते. हे दूध इतकं घट्ट असतं की, पाण्यात मिक्स होऊ शकत नाही. ते थेट पिल्याच्या तोंडात जातं. म्हणजे पिल्लू दूध खेचून न पिता तोंडात भरून घेतं. ज्याने त्याचं पोट भरतं. एक्सपर्टनुसार, व्हेलच्या दुधात सामान्य दुधापेक्षा जास्त फॅट असतं आणि ते घट्टही जास्त असतं. यातील चरबीने पिल्यांना वाढ होण्यास मदत होते आणि समुद्रातील थंड वातावरणात राहण्याची क्षमताही मिळते. हेच कारण आहे की, व्हेलच्या पिल्ल्यांची वाढ फार वेगाने होते.

समुद्री जीवन दाखवणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि लोकांच्या त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही आल्या. लोक निसर्ग आणि त्याच्या अद्भुत व्यवस्थेचं भरभरून कौतुक करत आहेत. एकाने याला 'निसर्गाचा चमत्कार' म्हटलंय, तर काहींनी विज्ञानाचं उत्तम उदाहरण. एक्सपर्ट सांगतात की, ही प्रक्रिया लाखो वर्षात विकसित झाली. जेणेकरून व्हेल आपल्या पिल्ल्यांना सुरक्षितपणे पोषण देऊ शकेल. पाण्यात राहू दूध सुरक्षितपणे आपल्या पिल्यापर्यंत पोहोचवणं काही सोपं नसतं. अशात व्हेल एका खास पद्धतीने हे काम करते.

Web Title : व्हेल का पानी के भीतर दूध पिलाना: वायरल वीडियो में प्रकृति का चमत्कार।

Web Summary : वायरल वीडियो में व्हेल के बच्चों को पानी के भीतर दूध पिलाने का तरीका दिखाया गया है। व्हेल गाढ़ा, वसायुक्त दूध सीधे बछड़े के मुंह में छोड़ती हैं, जिससे वह घुल नहीं पाता। यह अनुकूलन ठंडे समुद्र के पानी में तेजी से विकास और अस्तित्व सुनिश्चित करता है, जो प्रकृति की सरलता को दर्शाता है।

Web Title : Whale's underwater nursing: Nature's marvel revealed in viral video.

Web Summary : A viral video reveals how whales nurse their young underwater. Whales eject thick, fat-rich milk directly into the calf's mouth, preventing it from dissolving. This adaptation ensures rapid growth and survival in cold ocean waters, showcasing nature's ingenuity.