चमत्कार! अवयव दानाची सुरू होती तयारी, तेव्हाच मृत घोषित तरूण घेऊ लागला श्वास; डॉक्टर हैराण..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 12:28 PM2021-04-01T12:28:40+5:302021-04-01T12:28:53+5:30

१८ वर्षीय लुईस इंग्लंडच्या स्टॅफोर्डशायरचा आहे आणि १३ मार्चला त्याचा अपघात झाला होता. यात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला होता.

England brain dead teenager wakes up just hours before organ donation | चमत्कार! अवयव दानाची सुरू होती तयारी, तेव्हाच मृत घोषित तरूण घेऊ लागला श्वास; डॉक्टर हैराण..

चमत्कार! अवयव दानाची सुरू होती तयारी, तेव्हाच मृत घोषित तरूण घेऊ लागला श्वास; डॉक्टर हैराण..

Next

जर एखादी व्यक्ती ज्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तो जर अचानक अवयव दान करण्याआधी श्वास घेऊ लागेल तर याला चमत्कारच म्हटलं जाईल. इंग्लंडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका मृत घोषित करण्यात आलेल्या व्यक्तीच्या अवयव दानाची तयारी सुरू होती. तेव्हाच अचानक तो जिवंत झाला. १८ वर्षीय या व्यक्तीचं नाव आहे लुईस रॉबर्ट्स आणि डॉक्टरांचं मत आहे की, अवयव दानाच्या ठीक आधी लुईसने डोळ्यांच्या पापण्या हलवल्या आणि तो श्वास घेऊ लागला.

१८ वर्षीय लुईस इंग्लंडच्या स्टॅफोर्डशायरचा आहे आणि १३ मार्चला त्याचा अपघात झाला होता. यात तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला होता. त्याच्या डोक्याला फार जास्त जखमा झाल्या होत्या. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा फार काही फायदा झाला नव्हता.

चार दिवसांनी त्याच्या फॅमिलीला सांगण्यात आले की, तो जीवन आणि मृत्यूमधील लढाई हरला आहे. डॉक्टरांनी लुईसला मृत घोषित केले आहे. ज्यानंतर  त्याच्या परिवाराने त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. लुईसच्या परिवाराने विचार केला की, त्याच्या अवयव दानामुळे ७ लोकांना जीवन मिळेल.

पण अवयव दानासाठी सर्जरी करणार इतक्यात चमत्कार झाला आणि लुईस श्वास घेऊ लागला. हे पाहून डॉक्टर हैराण झाले. त्याच्या शरीरातील अवयवांमध्ये हालचाल होऊ लागली होती. डॉक्टरांनी पाहिलं की, तो त्याचं डोकं हलवत आहे. अर्थातच हे डॉक्टरांसाठीही शॉकिंग होतं. तेच त्याच्या परिवाराला जेव्हा हे समजलं की, लुईस जिवंत आहे तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
 

Web Title: England brain dead teenager wakes up just hours before organ donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.