Railway Facts : भारतीय रेल्वेकडून ट्रॅकचं आधुनिकीकरण करण्यासाठी अनेक प्रोजेक्ट हाती घेतले आहेत. २०२६ - २७ पर्यंत ७,९०० किलोमीटर ट्रॅकचं नुतनीकरण करण्याचं लक्ष्य आहे. बऱ्याच भागांमध्ये ९५ टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झालंय. ज्यामुळे पॅसेंजर आणि माल गाड्यांची गर्दी जरा कमी झाली. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल, तेव्हा रेल्वे ट्रॅक पाहिले असतीलच. सामान्यपणे रेल्वेसंबंधी रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे लाइन असे दोन शब्द प्रचलित आहेत. पण अनेकांना हे माहीत नसतं की, रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे लाइनमध्ये फरक असतो. यात दोन्हीत काय फरक असतो हेच आपण पाहणार आहोत.
रेल्वे ट्रॅक
रेल्वे लाइनवर ठेवण्यात आलेल्या पटरीच्या संरचनेला रेल्वे ट्रॅक म्हटलं जातं. ट्रॅकमध्ये दोन समांतर स्टीलच्या पटरी, स्लीपर, फास्टनिंग्स, बॅलास्ट म्हणजे गिट्टीचा थर, खालची रचना यांचा समावेश असतो. ट्रॅक रेल्वेचं वजन उचलतात आणि व्यवस्थित गति देतात. भारतीय रेल्वेत ट्रॅक लेंथ रूट लेंथपेक्षा जास्त असते. कारण डबल किंवा मल्टीपल ट्रॅकची एकूण लांबी दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक होते.
रेल्वे लाइन काय असते?
दोन स्टेशनमधील निश्चित रूट किंवा मार्गाला रेल्वे लाइन म्हटलं जातं. म्हणजे एका शहरापासून दुसऱ्या एखाद्या शहरामधील रेल्वे लाइन निश्चित केली जाते. यात स्टेशन, सिग्नलिंग सिस्टीम, ओव्हरब्रिज, अंडरपास आणि एकूण रूटची लांबी असते. भारतीय रेल्वेत रूट लेंथलाच रेल्वे लाइन म्हटलं जातं.
देशातील सगळ्यात मोठी रेल्वे लाइन कोणती?
भारतीय रेल्वे जगातील सगळ्यात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. जेव्हा सगळ्यात लांब रेल्वे लाइनचा विषय येतो तेव्हा डिब्रूगढ (आसाम) ते कन्याकुमारी (तामिळनाडू)ची रेल्वे लाइन सगळ्यात मोठी मानली जाते. या मार्गावर विवेक एक्सप्रेस धावते. ही देशातील सगळ्यात लांबचा प्रवास करणारी पॅसेंजर रेल्वे आहे. ही रेल्वे साधारण ४,१५४ ते ४,२८६ किलोमीटर इतकं अंतर पार करते. या प्रवासाला साधारण ७४ ते ८२ तास लागतात. ही रेल्वे प्रवासादरम्यान तब्बल ५७ ते ५९ स्टेशनवर थांबते. तर ८ ते ९ राज्यांमधून जाते.
Web Summary : Railway tracks are the physical structure, while railway lines are routes. India modernizes tracks; 7,900 km targeted by 2027. Dibrugarh to Kanyakumari is the longest route.
Web Summary : रेलवे ट्रैक भौतिक संरचना है, जबकि रेलवे लाइनें मार्ग हैं। भारत पटरियों का आधुनिकीकरण करता है; 2027 तक 7,900 किमी का लक्ष्य है। डिब्रूगढ़ से कन्याकुमारी सबसे लंबा मार्ग है।