शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

४६५ वर्षांपूर्वीच करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी? जाणून घ्या काय सुरू आहे चर्चा....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 1:09 PM

या भविष्यवेत्त्याच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्याचा अनेकदा दावा केला जातो.

जगभराला भितीचं वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोना व्हायरसचं थैमान काही थांबायचं नाव घेत नाहीये. चीनमध्ये १ हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी यात गेलाय तर जगभरातील ४० हजारांपेक्षा अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. आधीच हा व्हायरस कुठून आला, कसा आला अशी चौकाचौकात चर्चा होत असताना या व्हायरसची ४६५ वर्षांआधीच भविष्यवाणी करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. फ्रान्सचे जगप्रसिद्ध भविष्यवेत्ते नास्त्रेदमस यांनी ही भविष्यवाणी केल्याचं बोललं जात आहे.

चीनमध्ये जन्माला आलेल्या कोरोना व्हायरसचं जाळं आता दुसऱ्या देशांमध्येही झपाट्यानं पसरत आहेत. फ्रान्स, जर्मनी, जापान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, मलेशिया, कंबोडिया, श्रीलंका, यूएई, साऊथ कोरिया, व्हिएतनाम, थायलंड, कॅनडा आणि नेपाळमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसचे प्रकरणं समोर आले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ज्यांच्या कितीतरी भविष्यवाणी खऱ्या ठरल्या त्या नास्त्रेदमस यांनी जवळपास ४६५ वर्षांपूर्वी कोरोना व्हायरसची भविष्यवाणी केली होती. ट्विटरवर मार्को मलाकारा नावाच्या एका यूजरनं लिहिलं, ‘जगभरात पूर, आग आणि कोरोना व्हायरसचं संकट याची ४६५ वर्षांपूर्वी नास्त्रेदमसनं भविष्यवाणी केली होती.’

अनेक तज्ज्ञांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की, मायकल डी नास्त्रेदमस यांनी १५व्या शतकामध्ये भविष्यवाणीत एक भयंकर रोगाची साथ पसरणार असल्याचा संशय व्यक्त केला होता.

स्पॅनिश भाषेत एका दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘२१व्या शतकामध्ये येणाऱ्या महामारीनं पाऊल ठेवलं आहे. ही नास्त्रेदमस यांनी केलेली भविष्यवाणी होती. आपण आता अंताच्या खूप जवळ आहोत.’

त्यांनी त्यांच्या पुस्तकात यासाठी थेट कोरोना व्हायरस नाही तर 'The great plague' असा शब्द प्रयोग केला आहे. 

(Image Credit : nytimes.com)

नास्त्रेदमसची भविष्यवाणी ही रहस्यमय वाक्यात होती. त्यांनी ही भविष्यवाणी पहिल्यांदा १५५५ मध्ये पहिली भविष्यवाणी केली होती. तर ऑनलाईन थियोरिस्ट्सने दावा केलाय की, नास्त्रेदमस यांनी एका कवितेच्या कडव्यामध्ये कोरोना व्हायरसचा उल्लेख केला होता. यात समुद्राजवळील एका शहरामध्ये मोठ्या रोगाची साथ पसरेल आणि त्यात लोकांचा मृत्यू होईल, असं म्हटलं गेलं आहे. इतकेच नाही तर चीनच्या पूर्वेतील हुबेई प्रांताचा त्यात उल्लेखही होता. वुहान हे तेच शहर असल्याचं काही लोक मानत आहेत.

नास्त्रेदमस यांनी त्यांच्या ‘द प्रोफेसीज २०२०’ या पुस्तकामध्ये जवळपास ५०० वर्षांपूर्वी वेगवेगळी भविष्य वर्तवले आहेत. त्यात त्यांनी २०२० हे वर्ष विनाशाचं वर्ष म्हटलं आहे. इतकेच नाही तर जगातील मोठमोठ्या शहरांमध्ये गृह युद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल