चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 09:21 AM2021-07-21T09:21:38+5:302021-07-21T09:23:31+5:30

Viral Video : चिमुकल्याचा हा व्हिडीओ होतोय जबरदस्त व्हायरल. वाद्यांच्या आवाजावर चिमुकल्यानं केलेल्या डान्स स्टेप्स पाहून सर्वच चक्रावून जातील. 

child amazing dance video goes viral on internet everybody likes wideo ips officer shared | चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video

चिमुकल्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही चक्रावून जाल; जोरदार Viral होतोय हा 'कडक' Video

Next
ठळक मुद्देचिमुकल्याचा हा व्हिडीओ होतोय जबरदस्त व्हायरल.वाद्यांच्या आवाजावर चिमुकल्यानं केलेल्या डान्स स्टेप्स पाहून सर्वच चक्रावून जातील. 

आयएएस अधिकारी अवनीश शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. इंटरनेटवरून आपल्याला दररोज अनेक व्हिडीओ पाहायला मिळत असतात. काही व्हिडीओ आपल्याला इंटरेस्टिंग वाटतात, तर काही व्हिडीओ न पाहताच आपण पुढे जाते. परंतु काही व्हिडीओ असेही असतात जे आपल्या हृदयात घर करून जातात किंवा जे पाहून आपल्याला आनंद मिळतो. असाच एक व्हिडीओ इंटरनेटनवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सध्या चिमुकल्याचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. तुम्ही देखील हा व्हिडीओ पाहिलात तर पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही. 

या व्हिडीओला अवनीश यांनी कॅप्शनही दिलं आहे. 'डान्स असा करा की कोणी आपल्याला पाहतच नाही. प्रेम असं करा की जसं हर्टच होऊ नये, गाणं असं गा की जसं कोणी ऐकत नसावं आणि असं जगा जसा पृथ्वीवरच स्वर्ग आहे,' असं त्यांनी व्हिडीओसोबत लिहिलं आहे.


या व्हिडीओमध्ये काही लोक वाद्य वाजवताना दिसत आहेत. जसं वाद्य वाजण्यास सुरूवात होते, एक चिमुकला डान्स करण्यास सुरूवात करतो. त्याच्या स्टेप्स इतक्या कमालीच्या आहेत की अनेक जण ते पाहून चक्रावून जातील. आजूबाजूला कोणीच नाहीये असं समजून आपल्याच धुंदीत हा चिमुकला डान्स करताना दिसत आहे. २४ सेकंदाच्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले आहे. २०१८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा यांनीदेखील या व्हिडीओवरून रिअॅक्शन दिली आहे. 

Web Title: child amazing dance video goes viral on internet everybody likes wideo ips officer shared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.