मधुचंद्राच्या रात्री नवरी म्हणाली, अहो पोटात दुखतंय; त्यानंतर जे झालं, ते वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 11:49 AM2021-05-07T11:49:59+5:302021-05-07T11:51:34+5:30

मनोज सोनी नावाच्या तरूणाने एका व्यक्तीच्या माध्यमातून ३५ हजार रूपये देऊन एक मुलगी खरेदी केली होती. या मुलीसोबत त्याने घरातच लग्न केलं. पण....

Bhind bride escaped husband house before honeymoon in MP | मधुचंद्राच्या रात्री नवरी म्हणाली, अहो पोटात दुखतंय; त्यानंतर जे झालं, ते वाचून व्हाल हैराण

मधुचंद्राच्या रात्री नवरी म्हणाली, अहो पोटात दुखतंय; त्यानंतर जे झालं, ते वाचून व्हाल हैराण

Next

काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशमध्येलग्नाच्या नावावर महिलांनी फसवणूक केलेल्या अनेक घटना समोर आल्या होत्या. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या भिण्ड कोतवाली परिसरातील बैरागपुरा येथील एक नवरी मधुचंद्राच्या रात्रीच घरातून पळून गेली. मनोज सोनी नावाच्या तरूणाने एका व्यक्तीच्या माध्यमातून ३५ हजार रूपये देऊन एक मुलगी खरेदी केली होती. या मुलीसोबत त्याने घरातच लग्न केलं. मधुचंद्राच्या रात्री पोट दुखत असल्याचं कारण देत नवरी फरार झाली.

आता नवरदेव कुणाला काही सांगू शकत नाहीये. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या सर्व भावांनी लग्ने केली आणि आपला संसार थाटला. अशात मनोजनेही आपला संसार थाटण्यासाठी ओळखीतील एका व्यक्तीच्या मदतीने ३५ हजारात एक मुलगी खरेदी केली. (हे पण वाचा : बोंबला! हनीमूनच्या रात्री जवळ जाताच नवरदेवाला आला खोकला, माहेरी पळून गेली नवरी आणि मग...)

४ मे रोजी घरातच त्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. पुजाऱ्यासमोर दोघांनी सात जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली. मित्रांनी मनोजच्या मधुचंद्रासाठी खोलीही सजवली. पण सकाळी अचानक नवरी गायब झाल्याने नवरदेवासोबत त्याचे मित्रही नाराज झाले. (हे पण वाचा : बोंबला! नवरीने लग्न मंडपातच घेतली नवरदेवाची शाळा,२ चा पाढा नाही आला तर लग्नास दिला नकार!)

असे सांगितले जात आहे की, रात्री साधारण ११ वाजता मनोज आपल्या रूममध्ये गेला. तेव्हा त्याला त्याची नवी नवरी म्हणाली की, तिच्या पोटात दुखत आहे. मनोजला वाटलं की, गरमीमुळे पोट दुखत असेल तर त्याने तिला जरा चालायला सांगितलं.

साधारण एक तासानंतर पत्नी म्हणाल की, तिला अजूनही बरं वाटत नाहीये. काहीतरी औषध घेऊन या. यानंतर मनोज लगेच दुकानात औषध आणायला गेला. जेव्हा तो परतला तेव्हा त्याची पत्नी रूममधून गायब होती. आता शरमेने तो फसवणूक झाल्याची तक्रारही करू शकत नाहीये. त्याला अजूनही आशा आहे की, त्याची पत्नी कुठेही गेली नाही ती परत येईल.
 

Read in English

Web Title: Bhind bride escaped husband house before honeymoon in MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app