बालकलाकारांच्या चित्तथरारक कसरतीने वेधले लक्ष

By Admin | Updated: May 3, 2014 16:19 IST2014-05-03T15:00:01+5:302014-05-03T16:19:49+5:30

सिडको : साई मंदिर उत्सवास प्रारंभ

Attractive attention of the child artist | बालकलाकारांच्या चित्तथरारक कसरतीने वेधले लक्ष

बालकलाकारांच्या चित्तथरारक कसरतीने वेधले लक्ष

सिडको : साई मंदिर उत्सवास प्रारंभ

सिडको : जुन्या सिडकोतील श्री साईनाथ मंदिराच्या तिसर्‍या वर्धापनदिनास साईपालखी मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ झाला. कोल्हापूरच्या बाल मंडळाच्या बालकलाकारांनी सादर केलेल्या साहसी, चित्तथरारक शारीरिक कसरती या पालखी मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले.
जुन्या सिडकोतील श्री साईनाथ मंदिराच्या तिसर्‍या वर्धापन दिनानिमित्त तीनदिवसीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. साईपालखी मिरवणुकीने या उत्सवास प्रारंभ झाला. साईनाथ मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती. शिवसेना नेते जयंत दिंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून साईपालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. कोल्हापूरच्या बाल मंडळाचे पथक, मालेगावचे हलगी पथक यासारखे वाद्यवृंद, विद्युत रोषणाई केलेली पालखी, भालदार-चोपदार हे या सोहळ्याचे खास आकर्षण होते. शिवाजी चौक, राणाप्रताप चौक, तुळजा भवानी मंदिर, शांतीनगर या परिसरातून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली. साईपालखीचे प्रत्येक चौकात साईभक्तांनी पालखी मार्गावर सडा, रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून स्वागत केले. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात मिरवणुकीत सहभागी झाला होता.
या मिरवणुकीत ओम साईनाथ ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तिदमे, विक्रम काळे, किरण भामरे, चंद्रकांत कानकाटे, पोपटराव हगवणे, बाळासाहेब सोनवणे, जिभाऊ अहिरे, संदीप पांडे, पद्माकर काळे, देवीदास देवकर, सुनील निकुंभ, नाना काळे, नाना पाटील, गिरीश जोशी यांसह साईभक्त व महिला सहभागी झाले होते. दरम्यान, शनिवार, दि. ३ मे रोजी महाप्रसादाने या साई उत्सवाची सांगता होणार आहे. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Attractive attention of the child artist