शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! ऑनलाईन ऑर्डर केला व्हिडियो गेम अन् मिळालं कंडोम आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 13:25 IST

आत्तापर्यंत तुम्ही अनेकदा ऑनलाईंन शॉपिंग केलं असेल.

आत्तापर्यंत तुम्ही अनेकदा ऑनलाईंन शॉपिंग केलं असेल. कारण सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांना काही वस्तू अथवा स्वतःसाठी काही खरोदी असल्यास वेळ मिळत नाही. पण आज तुम्हाला अश्या घटनांबद्दल सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हाला जर काही ऑनलाईन ऑर्डर करायचं असेल. तर दहा वेळा विचार कराल. कारण अनेकदा तुम्ही ऑर्डर एक गोष्ट करत असत आणि डिलीव्हरी झाल्यानंतर भलतीच गोष्ट हाती येते. त्यामुळे पैशांचं नुकसान होतं.

इंग्लंडमध्ये एका व्यक्तीने अ‍ॅमेझॉनवरून काही सामान मागवले. पण ते सामान त्याच्या हाती लागलं,तेव्हा अनपेक्षित प्रकार घडला.  ही गोष्ट इंग्लंडमधील अनेकांसोबत घडली. ऑर्डर केलेली वस्तू मिळण्याऐवजी कोणाला बॅटरी, कोणाला वॉशिंग पावडर तर कोणाला टुथब्रश अशा वस्तु डिलीव्हरी झाल्यानंतर मिळाल्या. काहीजणांकडे चक्क कंडोम मिळाले. 

(Image credit- Fast delivery services)

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार लूसी हेंडरसन यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसाला भेटवस्तू  देण्यासाठी 'नाइटेंडो स्विच' नावाचा व्हिडीयो गेम ऑर्डर केला. पण जेव्हा त्यांच्याकडे सामानाची डिलीव्हरी झाली. तेव्हा त्या आश्चर्यचकीत झाल्या,कारण त्यावेळी त्यांना ड्यूरासेल बॅटरीचं एक पाकीट आणि वॉशींग पावडरचा एक डब्बा डिलीव्हर करण्यात आला. 

पैलादिन शाज नावाच्या गृहस्थासोबत सुध्दा हाच प्रसंग घडला. त्या व्यक्तीने अ‍ॅमेझॉन वरून नाइटेंडो स्विच हा व्हिडीयो गेम ऑर्डर केला. पण ज्यावेळी डिलीव्हरी  करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे ओरल बी कंपनीचा टुथब्रश आणि दाढी करायचा रेजर पोहोचवण्यात आला.  अशाच प्रकारे विकी कारपेंटर नावाच्या एका महिलेने ख्रिसमसची भेटवस्तू देण्यासाठी काही सामान मागवलं होत. पण त्या महिलेला ऑर्डर केलेल्या वस्तुच्याऐवजी  जे मिळालं ते पाहून तिचा फारच अपेक्षाभंग झाला. चक्क बेडशीटची डिलीव्हरी झाली होती. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके