शहरं
Join us  
Trending Stories
1
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
2
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
4
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
5
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
6
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
7
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
8
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
9
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
10
मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला
11
Sanjay Raut: "लोक भाजपला मतदान करून आपल्या कर्माची फळं भोगतायत!" संजय राऊत असं का म्हणाले?
12
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
13
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
14
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
15
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
16
Payal Kapadia : नेत्रदीपक भरारी! पायल कपाडिया यांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
17
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
18
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
19
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
20
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
Daily Top 2Weekly Top 5

साप आपली शिकार किती दुरून बघू शकतात, पाहा माहीत नसतील सापांच्या 'या' खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:48 IST

Amazing Facts About Snakes : बरेच लोक असा विचार करतात की, साप फार दुरूनच बघू शकतात की, त्यांची शिकार कुठे आहे. पण मुळात सत्य वेगळं आहे.

Amazing Facts About Snakes : साप जगातील सगळ्यात रहस्यमय जीवांपैकी एक मानले जातात. सोबतच सगळ्यात खतरनाकही. साप आपली शिकार दुरूनच बघू शकतात. पण मग प्रश्न असा पडतो की, साप आपली शिकार किती दुरून बघू शकतो. तेच जाणून घेऊया. बरेच लोक असा विचार करतात की, साप फार दुरूनच बघू शकतात की, त्यांची शिकार कुठे आहे. पण मुळात सत्य हे आहे की, सापाची बघण्याची क्षमता फार कमी असते. अशात आपली शिकार किती दूर आणि कुठे आहे हे जाणून घेण्यासाठी साप शरीराच्या इतर अवयवांचा वापर करतात.

शिकार कुठे आहे याची माहिती सापांना लगेच मिळते, कारण ते यासाठी केवळ आपल्या डोळ्यांवर अवलंबून राहत नाही. साप आपली जीभ बाहेर काढून हवेत फिरवतात, या द्वारे ते आपल्या शिकारीचा गंध ओळखतात. सामान्यपणे साप आपल्या डोळ्यांनी स्पष्टपणे केवळ १ ते ३ मीटर म्हणजे ३ ते १० फुट दूरचंच बघू शकतात. किंग कोब्रासारख्या काही मोठ्या मोठ्या सापांची दूरचं बघण्याची क्षमता अधिक असते. ते साधारण १० ते १५ अंतरावरील गोष्टी बघू शकतात.

सापांना दूरच्या गोष्टी स्पष्टपणे दिसत नाहीत. त्यामुळे ते आपली दुरची शिकार डोळ्यांनी बघू शकत नाही. साप दूर बसलेली आपली शिकार शोधण्यासाठी जिभेचा वापर करतात. जि‍भेद्वारेच त्यांना कळतं की, शिकार आजूबाजूला आहे की नाही. सापांना कान नसतात, पण त्यांना आजूबाजूला होणाऱ्या हालचालीची चांगलीच जाणीव असते. जमिनीवर होणाऱ्या हलक्या कंपणाने त्यांना गोष्टी कळतात. जर एखादा मनुष्य किंवा शिकार त्याच्याजवळ येत असेल तर त्यांना लगेच कळतं.

काही साप जसे की, वायपर, बोआ आणि अजगर आपल्या शिकारीच्या शरीरातून निघणारी उष्णता जाणवू शकतात. अशात संधी मिळताच साप त्यांच्यावर झडप घेतात. त्यांच्या डोक्यावर एक खास सेन्सर असतं, जे अंधारातही शिकार आसपास असल्याची माहिती देतं.  

English
हिंदी सारांश
Web Title : Snakes: How Far Can They See? Snake Facts Revealed!

Web Summary : Snakes have poor eyesight, relying on scent and vibrations to hunt. They use their tongues to smell prey up to 10 feet away. Some snakes sense heat, using special sensors to detect prey in the dark. They feel ground vibrations too.
टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटकेsnakeसाप