शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कधी विचार केलाय का टॉयलेट पेपर नेहमी पांढराच का असतो? जाणून घ्या तीन कारणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 17:03 IST

कधी तुम्ही याचा विचार केलाय का की टॉयलेट पेपर नेहमी पांढऱ्या रंगाचेच का असतात? टिश्यू पेपर भलेही प्रिंटेड आणि रंगीबेरंगी येत असतील, पण टॉयलेट पेपर नेहमीच पांढरेच असतात.

भलेही पाश्चिमात्य देशांच्या तुलनत आपल्या देशात टॉयलेट पेपरचा वापर करण्याचं चलन फार कमी आहे. पण हळूहळू यात वाढ होत आहे. आधी केवळ हॉटेल्समधील वॉशरूममद्ये पेपर टिश्यू दिसत होते.  आता ऑफिस आणि अनेक घरांमद्ये यांचा वापर सुरू झाला आहे. तुम्हीही अनेकदा टॉयलेट पेपरचा वापर केला असेलच. पण कधी तुम्ही याचा विचार केलाय का की टॉयलेट पेपर नेहमी पांढऱ्या रंगाचेच का असतात? टिश्यू पेपर भलेही प्रिंटेड आणि रंगीबेरंगी येत असतील, पण टॉयलेट पेपर नेहमीच पांढरेच असतात.

काय आहे कारण?

टॉयलेट पेपर नेहमीच पांढऱ्या रंगाचा असण्यामागे काही नियम नाही. पण असं असण्यामागे वैज्ञानिक आणि कमर्शिअल कारण आहे. त्यासोबतच पर्यावरणाच्या सुरक्षेबाबतही टॉयलेट पेपरचा रंग पांढरा ठेवला जातो. याचं एक कारण म्हणजे ब्लीच करण्याआधी पेपरचा रंग भुरका असतो. ब्लीच केल्यावर पेपरचा रंग पांढरा होतो. भुरक्या रंगाला कलर करण्याच्या तुलनेत ब्लीच करायला कमी खर्च येतो. त्यामुळे टॉयलेट पेपरची किंमत कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कंपन्या ते पांढरेच ठेवतात.

टेक्‍नॉलॉजी डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, पर्यावरणाच्या नजरेने बघायचं तर पांढरा टॉयलेट पेपर रंगीत पेपरच्या तुलनेत लवकर डीकंपोज होतो. त्यामुळे याचा रंग पांढरा ठेवणं फायद्याचं आहे. सोबतच रंगीन पेपरच्या वापराने आरोग्यासंबंधी समस्या होऊ नये, त्यामुळे डॉक्टरही पांढऱ्या टॉयलेट पेपरला चांगलं मानतात.

काही कंपन्यांनी केले प्रयोग

टॉयलेट पेपर पांढरा ठेवण्यामागे इतकी महत्वाची कारणे असूनही काही कंपन्यांनी रंगीन किंवा प्रिंटेड टॉयलेट पेपरच्या प्रॉडक्शनचा प्रयत्न केला होता. पण ते चलनात येऊ शकले नाहीत. जगातल्या साधारण सर्वच देशांमध्ये टॉयलेट पेपर पांढराच वापरला जातो. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके