शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

घर भाड्याने घेण्याच्या नावाखाली तरुणाला ९५ हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:12 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर चौधरी हा तरुण पुण्यात खासगी नोकरीला आहे. लॉकडाऊनमुळे सध्या जळगावातील घरुनच ऑनलाइन कामकाज सुरू आहे. ...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर चौधरी हा तरुण पुण्यात खासगी नोकरीला आहे. लॉकडाऊनमुळे सध्या जळगावातील घरुनच ऑनलाइन कामकाज सुरू आहे. अमरावती शहरात त्याचे स्वत:चे घर असल्याने मॅजिकब्रिक्स या वेबसाईटवर ऑनलाइन जाहिरात दिली होती. त्यावरून ५ जून रोजी रणदीप सिंग नाव सांगून एका व्यक्तीने मोबाइलवर संपर्क साधला व मी आर्मीत जम्मू काश्मिरला नोकरीला असून, अमरावती युनिटला बदली झालेली आहे. त्यामुळे मला तुमचे घर भाड्याने घ्यायचे आहे, असे सांगितले. त्यानुसार चौधरी याने आधार कार्ड, पॅन कार्ड व कँटीन कार्ड व्हाॅटस‌् ॲपवर पाठवा म्हणून सांगितले असता, समोरील व्यक्तीने ते पाठविलेही. त्यानंतर संबंधित व्यक्तीने चौधरीकडे पेटीएम क्रमांक मागितला असता, त्यानेही तो दिला.

काही क्षणातच बँक खात्यातून पैसे वळविले

मयुर चौधरी याला ११ जून रोजी रात्री ८ वाजता संबंधित व्यक्तीचा फोन आला व १ रुपयाचा क्युआर कोड पाठवितो व तो तुम्ही पेटीएमवर स्कॅन करा त्यानंतर माझा एक रुपया व तुमचा एक रुपया परत येईल, असे असे तो म्हणाला. त्यानुसार दोन रुपये मयुरच्या खात्यावर आले. त्यानंतर संबंधिताने मयुरला परत क्युआर कोड पाठविला. त्यावरून १५ हजार ९९९ रुपये असे तीन वेळा ४७ हजार ९९७ रुपये मयुरच्या पेटीएमवरून पाठविले गेले. त्यानंतर मयुर याने घरी जाऊन परत १८ हजार रुपये पाठविले. एकूण ९५ हजार ९९६ रुपये मयुरच्याच पेटीएमवररून संबंधित व्यक्तीला पाठविण्यात आल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर क्राइम या पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदविली. गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला.