कुस्ती महासंघाची विनेशला तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:21 IST2021-08-27T04:21:14+5:302021-08-27T04:21:14+5:30

शाहीन आफ्रिदीची रँकिंगमध्ये मोठी झेप दुबई : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने वेस्ट इंडीजविरोधातील मालिकेत दोन सामन्यांत १८ ...

Wrestling Federation's Vinesh Tambi | कुस्ती महासंघाची विनेशला तंबी

कुस्ती महासंघाची विनेशला तंबी

शाहीन आफ्रिदीची रँकिंगमध्ये मोठी झेप

दुबई : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याने वेस्ट इंडीजविरोधातील मालिकेत दोन सामन्यांत १८ बळी घेतले आहेत. त्यामुळे त्याला आयसीसीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रँकिंगमध्ये त्याने आठवे स्थान मिळवले आहे. याआधीच्या रँकिंगमध्ये तो १८ व्या स्थानी होता. त्याने दहा स्थानांनी उसळी घेतली आहे. या यादीत पॅट कमिन्स पहिल्या, तर आर. आश्विन दुसऱ्या स्थानी कायम आहे. स्टुअर्ट ब्रॉड हा दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेला आहे. त्यामुळे त्याला गोलंदाजांच्या यादीतील अव्वल दहामधील स्थान गमवावे लागले.

मोहम्मद सिराजचा व्हिडिओ व्हायरल

लीडस् : भारतीय संघाचा पहिल्या डावात खुर्दा उडाल्यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी भारतीय संघाची हुर्रे उडवली. इंग्लिश प्रेक्षकांनी सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेल्या सिराजला डिवचले. त्यावर सिराजने आम्ही मालिकेत १-० ने पुढे आहोत, अशी खूण करून त्यांची बोलतीच बंद केली. त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

बार्मी आर्मीने कोहलीला डिवचले

लीडस् : इंग्लंडच्या बार्मी आर्मीने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याची टिंगल उडवली. त्याला चिरियो म्हणूनदेखील चिडवले. कोहलीने या सामन्यात ७ धावा केल्या, तर त्याने संपूर्ण मालिकेत ६९ धावा केल्या आहेत.

Web Title: Wrestling Federation's Vinesh Tambi