जामनेर येथील आश्रमात ३०० कन्यांचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 21:18 IST2019-10-14T21:16:14+5:302019-10-14T21:18:12+5:30

जामनेर : येथील गुरूदेव सेवा आश्रमात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या सांगतेप्रसंगी रविवारी कन्यापूजनाचा कार्यक्रम झाला. ग्रामीण भागातील सुमारे ३०० कन्यांचे ...

Worship of 3 daughters in the ashram at Jamner | जामनेर येथील आश्रमात ३०० कन्यांचे पूजन

जामनेर येथील आश्रमात ३०० कन्यांचे पूजन



जामनेर : येथील गुरूदेव सेवा आश्रमात नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांच्या सांगतेप्रसंगी रविवारी कन्यापूजनाचा कार्यक्रम झाला. ग्रामीण भागातील सुमारे ३०० कन्यांचे पूजन केले.
श्यामचैतन्य महाराज यांनी प्रवचन केले. मुलींच्या पालकांसह उपस्थितांनी सत्संगाचा लाभ घेतला. यावेळी गुरू पहाडसिंग, डॉ.नंदलाल पाटील, गणेश राठोड, स्वाती राठोड, डॉ.ऐश्वर्या राठोड यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रविण राजनकर, संजय राठोड, स्वप्निल पाटील, लवकुश चव्हाण, डॉ.श्रीकांत व्यवहारे, डॉ.आरीफ देशमुख, मनोज जाधव, संदिप पवार यांनी परिश्रम घेतले. निलेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार विठ्ठल जाधव यांनी मानले.

 

Web Title: Worship of 3 daughters in the ashram at Jamner