शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

आस्वाद चौकातील नाल्याची भिंत महिनाभरातच कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

निकृष्ट दर्ज्याचा कामाचे उदाहरण : अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मु. जे. महाविद्यालय ...

निकृष्ट दर्ज्याचा कामाचे उदाहरण : अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मु. जे. महाविद्यालय परिसरातील आस्वाद चौकात असलेल्या नाल्यालगत महिभरापूर्वी तयार केलेली संरक्षण भिंत एकाच पावसात ढासळली आहे. या निकृष्ट कामाबाबत या प्रभागातील नगरसेवक नितीन बरडे व अनंत जोशी यांनी याबाबत संबधित काम करणाऱ्या अभियंत्यावर कारवाईची मागणी केली आहे.

मु. जे. महाविद्यालय परिसरातील रामदास कॉलनीच्या बगिच्यापर्यंत नाल्याची संरक्षण भिंत उभारण्यासाठी गेल्या पंचवार्षिकमध्ये निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीतून काही काम करण्यात आले. परंतु त्यानंतर काम थांबले होते. मात्र, तीन महिन्यांपूर्वी पुन्हा नगरसेवक अनंत जोशी व नितीन बरडे यांनी पाठपुरावा करून मक्तेदाराला काम सुरू करण्यास भाग पाडले होते. हे काम गेल्या महिन्यातच पूर्ण झाले. यात मात्र, अवघ्या एका महिन्यात नाल्याच्या भिंतीचे काम किती तकलादू होते हे उघडकीस आले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे आस्वाद चौकाजवळील दूध सेंटरजवळ नाल्याची भिंत कोसळली आहे. ३० ते ४० फुट बांधकाम नाल्यात पडल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. त्यामुळे तातडीने नाल्यातील वेस्ट मटेरिअल बाहेर काढण्यात आले आहे. या निकृष्ट कामाला मनपातील अधिकारी जबाबदार असल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.