तौक्ते वादळाचा थरार अनुभवणारे वैभव पाटील सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:19 IST2021-05-25T04:19:32+5:302021-05-25T04:19:32+5:30

शहरातील गोविंदनगरी येथील रहिवासी माधवराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा वैभव पाटील मर्चन्ट नेव्ही मुंबई येथे नोकरीला असून काही ...

Vaibhav Patil, who is experiencing the thrill of the storm, is safe | तौक्ते वादळाचा थरार अनुभवणारे वैभव पाटील सुखरूप

तौक्ते वादळाचा थरार अनुभवणारे वैभव पाटील सुखरूप

शहरातील गोविंदनगरी येथील रहिवासी माधवराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा वैभव पाटील मर्चन्ट नेव्ही मुंबई येथे नोकरीला असून काही दिवसांपूर्वी कंपनीच्या कामानिमित्त समुद्रमार्गे जहाजाद्वारे प्रवास करत असतानाच तौक्ते चक्रीवादळामुळे त्यांचे जहाज समुद्रात अडकले होते. या चक्रीवादळाशी सतत ८ तास संघर्ष करत प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज देत असताना इंडियन नेव्हीचे जहाज त्यांच्याजवळ पोहोचले व जहाजावर अडकलेल्या प्रवाशांना वाचविण्यात यश आले.

तौक्ते वादळाचे रौद्ररूप बघून, क्षणभर सगळे संपल्यासारखे वाटत होते; पण आई, वडिलांचे आशीर्वाद आणि सत्कर्माचे फळ म्हणूनच या वादळातून सुखरूप बचावल्याची भावना वैभव याने व्यक्त केली. वैभव हा दोन दिवसांपूर्वी येथे घरी पोहोचल्यावर पाचोरा येथे संजय वाघ यांनी माधवराव पाटील यांच्या घरी जाऊन वैभवचा सत्कार करून सदिच्छा दिल्या. याप्रसंगी हरुण देशमुख, राहुल पाटील, सुभाष गोसावी, आर. डी. पाटील, नीलेश पाटील व परिवारातील सदस्य आदी उपस्थित होते.

Web Title: Vaibhav Patil, who is experiencing the thrill of the storm, is safe