शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:18 IST2021-09-26T04:18:30+5:302021-09-26T04:18:30+5:30

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव डी. जी. पाटील यांच्या संकल्पनेतून धरणगाव येथे परिहार चौक परिसरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. ...

Vaccination campaign on behalf of the City Congress Committee | शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने लसीकरण मोहीम

शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने लसीकरण मोहीम

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव डी. जी. पाटील यांच्या संकल्पनेतून धरणगाव येथे परिहार चौक परिसरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरण मोहिमेला प्रभागातील व परिसरातील बंधू-भगिनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ७५५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस प्रा. सम्राट परिहार, तालुका काँग्रेस अध्यक्ष रतिलाल चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र नाह्यदे, माजी उपनगराध्यक्ष अरुणा कंखरे, महिला तालुकाध्यक्ष चारू पाटील, संजय गांधी निराधार समिती सदस्य बंटी पवार, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष चंदन पाटील, बापू जाधव, दीपक जाधव, शहर काँग्रेस सरचिटणीस विकास लांबोळे, मनोज कंखरे, रामचंद्र माळी, नंदा महाजन, युवक अध्यक्ष गौरव चौव्हाण, उपाध्यक्ष राहुल मराठे, नंदन पाटील, आकाश बिवाल, सागर बाजपाई, भूषण लोहार, ज्ञानेश्वर मराठे, तसेच दिव्यांग लसीकरण समन्वय अधिकारी आर. एच. पाटील, ऋषिकेश जाधव, राकेश पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. मयूर जैन, कर्मचारी व आरोग्य सेविका यांनी लसीकरण शिबिर यशस्वी केले. प्रशासकीय सेवेतील पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.

Web Title: Vaccination campaign on behalf of the City Congress Committee