विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ४ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:28 PM2019-12-10T12:28:35+5:302019-12-10T12:28:45+5:30

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभ शनिवार,४ जानेवारी,२०२० रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी ...

 University convocation on 7th January | विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ४ जानेवारीला

विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ ४ जानेवारीला

Next

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा २८ वा दीक्षांत समारंभ शनिवार,४ जानेवारी,२०२० रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी १० वाजता होणार आहे.
२८ वा दीक्षांत समारंभासाठी ज्या स्नातकांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे पदवी,पदवीका प्रमाणपत्र मिळणेकरिता आवेदनपत्र जमा केले आहे, अशा पात्र स्नातकांची पदवी,पदविका प्रमाणपत्रांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. दरम्यान, दीक्षांत समारंभाच्या दिवशी जे स्नातक उपस्थित राहून पदवी,पदविका ग्रहण करणार आहेत. त्या स्नातकांना प्रमाणपत्राच्या क्रमांकानुसार पदवी, पदविका प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहे. उर्वरीत अनुपस्थित स्नातकांना पदवी, पदविका प्रमाणपत्र नमूद केलल्या पत्त्यावर टपालाने पाठविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली .

Web Title:  University convocation on 7th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.