वरखेडे धरणात बुडून काका-पुतण्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 12:05 IST2021-06-29T12:04:27+5:302021-06-29T12:05:45+5:30

पुतण्याला वाचविण्याच्या प्रयत्नात काकाचाही करुण अंत झाला आहे.

Uncle and nephew drown in Varkhede dam | वरखेडे धरणात बुडून काका-पुतण्याचा मृत्यू

वरखेडे धरणात बुडून काका-पुतण्याचा मृत्यू

कल्याण महाजन

वरखेडे, ता. चाळीसगाव : येथील वरखेडे बॅरेजमध्ये काका-पुतण्याचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी आठला ही घटना घडली. 


येथे गिरणा नदीवर असलेल्या वरखेडे बॅरेजमध्ये काका-पुतण्या अंघोळीसाठी गेले. पुतण्या मृणाल इंद्रसिंग पवार (वय १३ वर्ष) याने खोल पाण्यात उडी मारली. तो पाण्यात बुडायला लागला. हे पाहून काका हिरतसिंग जगतसिंग पवार (वय ४०) यांनी पुतण्याचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली, मात्र जास्त पोहता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

हिरतसिंग पवार हे पुणे येथे एसटी महामंडळमध्ये कार्यरत होते ते व शाळांना सुटी असल्यामुळे मृणाल हा नंदुरबार येथून आजी- बाबाकडे आला होता.
मृणालचे वडील इंद्रसिंग जगतसिंग पवारदेखील एसटी महामंडळ नंदुरबार येथे कार्यरत आहेत.

Web Title: Uncle and nephew drown in Varkhede dam