शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सभेत न झालेले ठराव मंजुरीचा घाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 12:15 IST

जळगाव : डिसेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत न झालेले विविध आर्थिक विषयांचे ठराव सभेला अंधारात ठेवून परस्पर ...

जळगाव : डिसेंबर महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत न झालेले विविध आर्थिक विषयांचे ठराव सभेला अंधारात ठेवून परस्पर मंजूर करण्यात येत असल्याचा घाट सत्ताधाऱ्यांकडून सुरू होता व त्यावर आक्षेप घेत तो हाणून पाडल्याचा दावा विरोधकांनी केला आहे़ याबाबत शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील व नानाभाऊ महाजन यांनी डेप्युटी सीईओ़ के़ बी़ रणदिवे यांच्याकडे हा आक्षेप नोंदविल्याची माहिती आहे़४ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली़ या सभेत ३४ ठराव करण्यात आले होते़ सर्व सभेचे चित्रिकरणही करण्यात आले होते़ अशा स्थितीत निविदांना मंजुरी, प्रशासकीय मान्यता, कामांना मुदतवाढीचा विषय अशा आर्थिक विषयाशी संबधित काही ठराव परस्पर फाईल न फिरविता, सीईओंची स्वाक्षरी न घेता, मर्जीतल्या लोकांना फायदा व्हावा म्हणून या सभेच्या ठरावामध्ये घुसविण्याचा सत्ताधारी प्रयत्न करीत होते़ असा आक्षेप शिवसेना सदस्यांनी डेप्युटी सीईओ रणदिवे यांच्याकडे आक्षेप नोंदविला. आश्वासन दिल्यानंतर लेखी तक्रार न दिल्याचे महाजन यांनी सांगितले़सौलर दिव्यांच्या त्या विषयाला स्थगितीचनिधी खर्चाची मुदत सप्टेंबरमध्ये संपल्याने सोलर दिवे बसविण्याच्या कामांचा निधी खर्च करण्याची मुदत सप्टेंबर महिन्यात संपली असतानाही निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार होत्या मात्र, निधीच मिळणार नसल्याने कामे कशी होतील, असा प्रश्न नानाभाऊ महाजन यांनी उपस्थित करून याबाबत पत्र दिले होते़ त्या कामांना स्थगिती देण्यात आली होती़ मात्र, निधी खर्च करण्याची मुदतवाढ ही ३१ मार्च असल्याचा ठरावही न होता तो घुसविण्याचा प्रयत्न झाला मात्र, यावरही आक्षेप झाल्यानंतर ही स्थगिती कायम ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे़

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव