शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या दिवशी धरणात बुडून दोन युवकांचा मृत्यू

By admin | Updated: October 7, 2014 14:55 IST

पालजवळील गारबर्डी धरणावर अंघोळ करत असताना फरहान खान कमाल खान (वय १८) व शेख अहमद शेख शब्बीर (वय १७) दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आणि ईदच्या सणावर विरजण पडले.

शेख अहमद

रावेर : पालजवळील गारबर्डी धरणावर अंघोळ करत असताना फरहान खान कमाल खान (वय १८) व शेख अहमद शेख शब्बीर (वय १७) दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आणि ईदच्या सणावर विरजण पडले.शहरातील उटखेडा रोडवरील रहिवासी असलेले १0 तरुण सकाळी बकरी ईदची नमाज पठण करून परतले. यानंतर चारचाकी वाहन भाड्याने करून ते तालुक्यातील पालजवळ असलेल्या गारबर्डी (सुकी) धरणावर सहलीसाठी गेले. त्यातील फरहान खान कमाल खान व शेख अहमद शेख शब्बीर हे दोघे धरणाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरले. या वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अंघोळीसाठी गेलेले हे तरुण बुडायला लागले. त्याठिकाणी जवळपास १0 फूट खोल पाण्याची पातळी आहे. त्यांना वाचवण्यासाठी एका मुलाने प्रयत्न केला; परंतु त्याला यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील मासेमारी करणार्‍या काही मुलांनी त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. सावदा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. रावेर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. रात्री शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत फरहानुद्दीन हा दवाखान्यात कंपाउंडर म्हणून रुग्णसेवा करत होता, तर शे. अहमद हा बांधकाम मजूर म्हणून काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. (वार्ताहर)