वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 12:09 PM2019-12-07T12:09:45+5:302019-12-07T12:10:42+5:30

महामार्गावरील अपघातात इसमाचे दोन्ही पाय निकामी

Two-wheeler seriously injured in sand damper dump | वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

Next

जळगाव : महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एका भरधाव वेगाने जाणाºया वाळूच्या डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत संजय कृष्णा कोळंबे (वय ५०, रा. गुजराल पेट्रोलपंप परिसर, जळगाव) हे गंभीर जखमी झाले. अपघातात त्यांचे दोन्हीही पाय निकामी झाले असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर कोणीही मदतीला येत नसताना भुसावळ येथून आरोपींना घेऊन येणाºया एमआयडीसी पोलिसांनीच जखमीला पोलीस व्हॅनमधून जिल्हा रुग्णालयात हलविले.
महामार्गावर दोन दिवसांपूर्वीच अपघात होऊन एका महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा दूरदर्शन टॉवरजवळ वाळू वाहतूक करणाºया डंपरने दुचाकीला धडक दिली.
पीयूसीसाठी थांबले आणि डंपरने दिली धडक
फैजपूर येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने ते लग्न आटोपून संजय कोळंबे व त्यांचे शालक महेंद्र भोळे (रा. पुणे) हे दोन्ही जण जळगाव येथे दुचाकीने घराकडे येत होते. त्या वेळी जळगावनजीक असलेल्या दूरदर्शन टॉवरजवळ रस्त्याच्या कडेला पीयूसीचे वाहन दिसल्याने ते दुचाकीच्या पीयूसीसाठी थांबले. त्या वेळी महेंद्र भोळे हे दुचाकीच्या खाली उतरले व कोळंबे हे रस्त्याच्या दुसºया कडेला असलेल्या पीयूसी वाहनाकडे जात असतानाच जळगावकडून भुसावळला वाळू घेऊन जाणाºया डंपरने (क्रमांक एमएच १९, सीवाय - ३१२४) दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, डंपरने दुचाकीला फरफटत नेले. त्याच वेळी कोळंबे यांच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले.
पोलीस धावले मदतीला
अपघातानंतर जखमी जागेवर विव्हळत असताना येणारे-जाणारे कोणीही थांबत नव्हते. त्याच वेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार हेमचंद्र झोपे, पोहेकॉ सुनील पाटील, रवींद्र महाले, चालक राजेंद्र पवार हे खुनातील दोन आरोपींना भुसावळ न्यायालयातून जळगाव येथे कारागृहात घेऊन येत होते. त्या वेळी त्यांनी अपघातस्थळी थांबून जखमीला तत्काळ पोलीस व्हॅनमध्ये टाकून जिल्हा रुग्णालयात हलविले.
दोन्ही पाय निकामी
कोळंबे यांनी डोक्यात हेल्मेट घातलेले होते. त्यामुळे धडकेनंतर ते खाली पडूनही त्यांना इजा झाली नाही. मात्र दोन्ही पायावरून डंपरचे चाक गेल्याने दोन्ही पायाचा चेंदामेंदा झाला. आतील मांस दिसत असल्याने पोलिसांनी जखमीच्या तोंडावर रुमाल बांधून त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले.
वाळू उठली जीवावर
वाळू उपशास बंदी असताना अद्यापही वाळू वाहतूक सुरूच असल्याचे प्रकार समोर येत आहे. त्यात शुक्रवारी वाळू वाहतूक करणाºयाच डंपरने दुचाकीला धडक दिल्याने ही वाळू आली कोठून? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भुसावळ येथे खाजगी बांधकामासाठी ही वाळू नेली जात होती, असे डंपरच्या चालकानेच सांगितले. त्यामुळे वाळू वाहतुकीकडे का डोळेझाक केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
डंपर चालकाही घेतले ताब्यात
एमआयडीसी पोलिसांनी जखमीला जिल्हा रुग्णालयात आणत असतानाच डंपरच्या चालकालाही ताब्यात घेऊन त्याला जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत आणले.

Web Title: Two-wheeler seriously injured in sand damper dump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव