शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मेहरूण तलावात दोघा विद्याथ्र्याचा बुडून मृत्यू

By admin | Updated: March 26, 2017 00:37 IST

नंदुरबारहून ‘अभियांत्रिकी’च्या शिक्षणासाठी आले होते जळगावी

जळगाव : मेहरूण तलावात पोहायला गेलेल्या बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकीच्या दोन विद्याथ्र्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास घडली. दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर दोघांचे मृतदेह हाती लागले. भूषण प्रकाश पाटील (वय 21, रा.वर्धमाननगर, नंदुरबार) व निखिल विजय पाटील (वय 20, रा.हुडको कॉलनी, नंदुरबार) अशी मृत विद्याथ्र्याची नावे आहेत.अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरू असल्याने दुपारी लवकर महाविद्यालयातून सुट्टी होते. भूषण पाटील, निखिल पाटील यांच्यासह मयूर गोसावी (रा.धुळे), चैतन्य पटेल (रा.नंदुरबार) व अंकुश सूर्यवंशी (रा.जळगाव) हे पाच विद्यार्थी शनिवारी दुपारी अडीच वाजता मेहरूण तलावाजवळ आले. शेती शिवाराला लागून असलेल्या तलावाकडून पाचही जण  तलावात पोहायला उतरले. निखिल व भूषण या दोघांना पोहता येत नव्हते.अन् दोघं बाहेर आलेच नाहीततलावात पोहत असताना मयूर, चैतन्य व अंकूर हे तिन्ही जण पावणे तीन वाजेच्या सुमारास बाहेर आले, मात्र निखिल व भूषण हे दोघे बाहेर आलेच नाही. दोघंही बुडाल्याचे पाहून बाहेर असलेल्या तिघांनी आरडाओरड केली.  एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी, शरद भालेराव या दोघांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पट्टीच्या पोहणा:यांना पाचारण करण्यात आले. दीड तासाच्या परिश्रमानंतर भूषणपाठोपाठ निखिलचा मृतदेह हाती लागला. जामनेर तालुक्यातील पळासखेडा येथे उर्दू शिक्षक असलेल्या पिरजादे निकारासिध्दी मिसवाऊद्दीन यांनी दोघांना अवघ्या 15 मिनिटांच्या आत बाहेर काढले.भूषणचे कुटुंबीय सुरतेत स्थायिकभूषण हा मूळचा नंदुरबार आहे. त्याचे वडील व आई रोजगारा- निमित्त सुरतला स्थायिक झाले आहेत. वडील वेल्डिंगचे काम करतात तर लहान भाऊ मितेश हादेखील शिरपूर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.     भूषण हा सिव्हिलच्या दुस:या वर्षाला शिकत होता.निखिलच्या घरी प्रचंड आक्रोशनंदुरबारच्या हुडको कॉलनीत निखिलचे कुटुंबीय स्थायिक आहेत.  निखिलचे वडील विजय पाटील हे नंदुरबार तालुका विधायक समितीच्या नंदुरबारच्या आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना निखिलसह एक मुलगी आहे.  निखिल हा मेकॅनिकल ट्रेडच्या पहिल्या वर्षाला होता. दोघेही कॉलेज वसतिगृहात रहात होते.