कोल्हे यांचे आणखी दोन साथीदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 01:06 PM2020-01-23T13:06:05+5:302020-01-23T13:06:44+5:30

जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे याच्या आणखी दोन साथीदारांना बुधवारी ...

Two more Kolhe's accomplices arrested | कोल्हे यांचे आणखी दोन साथीदार अटकेत

कोल्हे यांचे आणखी दोन साथीदार अटकेत

Next

जळगाव : बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर हल्ला झाल्याच्या प्रकरणात माजी महापौर ललित कोल्हे याच्या आणखी दोन साथीदारांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. गणेश अशोक बाविस्कर (२५, रा.तुरखेडा, ता.जळगाव) व नरेश नंदू आगरिया (२४, रा.वाघ नगर) अशी संशयितांची नावे आहेत. मंगळवारी राकेश नंदू आगरिया (२२, रा.वाघ नगर) व निलेश नंदू पाटील (२४, रा. मुळ रा.फागणे, ता. धुळे) या दोघांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ललित कोल्हे अद्यापही फरार आहे. शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अरुण निकम यांना गणेश व नरेश या दोघांची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, अक्रम शेख, सुधीर साळवे, भास्कर ठाकरे व साबळे यांच्या पथकाने दोघांना अटक केली. दरम्यान, चौघांना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. घटनेतील रिव्हॉल्वर, चाकू, दांडके तसेच खंडणीची ३ लाख ४४ हजार ७३७ रुपये वसूल करण्यासह ललित कोल्हे याला अटक करण्याचे कारण पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे.

Web Title: Two more Kolhe's accomplices arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.