शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

डंपरने दिली प्रांताच्या गाडीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 21:42 IST

वाळूमाफियांची मुजोरी वाढली : न्हावीची घटना, पाठलाग होत असताना वाहन नेले सुसाट

यावल/ फैजपूर : गेल्या काही दिवसांपासून वाळूमाफियांची मुजोरी मोठ्या प्रमाणावर वाढली असून वाळूमाफियांचा पाठलाग करणारे फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या शासकीय वाहनाला अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. ही घटना २४ रोजी रात्री न्हावी तालुका यावल गावात घडली.डंपरसह पळून जाण्याच्या प्रयत्नात ही धडक दिली. सुदैवाने यात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे चालक उमेश तळेकर यांना मुका मार लागला आहे, तसेच वाहनाच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बेकायदा वाळू वाहतुकीची माहिती मिळाल्याने प्रांताधिकारी कैलास कडलक हे किनगाव तालुका यावलपर्यंत गेले होते व तेथून परतत असताना न्हावी गावाकडे एक डंपर (एम एच१९-झेड ४७४९) जात असताना या डंपरचा प्रांताधिकारी यांनी पाठलाग केला. तेव्हा हा डंपर सुसाट वेगाने जाऊन न्हावी ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील अरुंद गल्लीत शिरला व पळून जाण्याच्या प्रयत्नात या डंपरने प्रांताधिकारी कडलक यांच्या शासकीय वाहनाला (एम एच१९ एम०७०८) जोरदार धडक दिली. यावेळी एमएच १९बी-एल १०१० वरील चालक-मालक ज्ञानेश्‍वर नामदेव कोळी रा. कोळन्हावी याने या प्रकाराला साथ दिली, तसेच त्याचे सोबतचा अर्जुन बाविस्कर रा. पुनगाव ता. चोपडा, चंद्रकांत सोळुंके रा. कोळन्हावी यांच्याविरुद्ध प्रांताधिकारी यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी डंपरसह महागडी चारचाकी जप्त केली असून तपास सपोनि प्रकाश वानखडे, फौजदार रोहिदास ठोंबरे व सहकारी करीत आहेत.महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलनमाफियांवर कारवाई करण्यासाठी पाठलाग करणाऱ्या प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्या वाहनावर वाळूमाफियांनी धडक देत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने या घटनेचा महसूल कर्मचारी संघटनांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला व एक दिवसासाठी कामकाज बंद ठेवले. यावेळी सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक व फैजपूर डीवायएसपी यांच्याकडे निवेदनाद्वारे काढण्यात आली असून यावल तहसीलदार महेंद्र पवार व रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे उपस्थित होते.डंपर चालकास अटकया घटनेप्रकरणी प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी तक्रार दिली असून, या तक्रारीवरून डंपर चालक महेंद्र धनराज तायडे यांच्यासह चौघांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. डंपर चालक महेंद्र तायडे याला अटक करण्यात आली असून डंपरसह एक महागडे चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले आहे.