शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

जळगावच्या महापौरांच्या कुटुंबातील तीन जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 12:14 PM

शहरात वाढता संसर्ग, नवीन ५० रूग्ण

जळगाव : जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून मंगळवारी जळगाव शहरात आणखी ५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार १४७ वर पोहोचली आहे़ दुसरीकडे महापौरांच्या कुटुंबातील तीन जणांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.विविध विभागात वाढता फैलावजळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे़ यात जळगाव शहरात अधिकच फैलाव वाढत असून विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्तेदेखील बाधित होत आहेत. यामध्ये जि.प.तील अधिकारी, पदाधिकारी बाधित होत असताना कोरोनाचा महापालिकेतही शिरकाव झाला. तेथेही अधिकाऱ्यांना बाधा होण्यासह आरोग्य विभागातील कोरोना योद्घानांही कोरोनाची लागण झाली. आता तर या कोरोनाची महापौरांच्या कुटुंबियांनाही लागण झाली आहे.लक्षणे नाहीमंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ३४५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले.यात जळगाव शहरात आढळून आलेल्या ५० बाधितांमध्ये महापौरांच्या कुटुंबातील तीन सदस्यांचाही समावेश आहे़ या तिन्ही सदस्यांनी मंगळवारी सकाळी अ‍ॅण्टीजन टेस्ट केल्यानंतर त्यांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले़ मात्र, तिघांना कुठलेही लक्षण नाहीत़ त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे़मनपात वाढती बाधा, अधिकारी रजेवरमनपाच्या सहायक आयुक्तांना कोरोनाची लागण झाल्याने ते रजेवर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील हा पदभार प्रभाग समिती चारचे प्रभाग अधिकारी तथा शाखा अभियंता उदय मधुकर पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पाटील यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला असून स्वत:चे काम सांभाळून त्यांनी हे काम पहावे, असे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आदेशामध्ये म्हटले आहे.या भागात आढळले रुग्णमंगळवारी महाबळ ४, आयोध्यानगर ४, शनीपेठ ३, सिंधी कॉलनी २, पोलीस लाईन २, रुख्मिनीनगर २, शिवाजीनगर २ यासह देवेंद्र नगर, पिंप्राळा, हिराशिवा कॉलनी, गेंदालाल मिल, दांडेकर नगर, व्यंकटेश नगर, पांडे चौक, नारायणी पार्क, ओम शांती नगर, हरी विठ्ठल नगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.शहरात सर्वाधिक रुग्णजळगाव शहरात सर्वाधिक एकूण ३ हजार १४७ कोरोना रुग्ण असून मंगळवारी देखील नवीन ५० रुग्ण आढळून आले. कोरोनामुळे एका दिवसात १५ जणांचा मृत्यू झाला असून त्यात सर्वाधिक ५ मृत्यू हे जळगाव शहरातील बाधितांचे झाले आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव