लीलावती अपार्टमेंटमधील बंद घरात चोरट्यांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:14 IST2021-04-17T04:14:47+5:302021-04-17T04:14:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मोहाडी रस्त्यावरील लीलावती जैन अपार्टमेंटमधील बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत दोन हजार रुपयांची ...

Thieves in a locked house in Lilavati apartment | लीलावती अपार्टमेंटमधील बंद घरात चोरट्यांचा डल्ला

लीलावती अपार्टमेंटमधील बंद घरात चोरट्यांचा डल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मोहाडी रस्त्यावरील लीलावती जैन अपार्टमेंटमधील बंद घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत दोन हजार रुपयांची रोकड व चार हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्‍यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.

लीलावती जैन अपार्टमेंटमध्ये योगराज परशुराम चिंचोरे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने चिंचोरे हे घराला कुलूप लावून परिवारासह म्हसावद येथील मूळ राहत्या घरी गेले. दरम्यान, १५ एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजता चिंचोरे यांना त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे नाना बोरसे यांनी घरात चोरी झाल्याचे कळविले. त्यानुसार चिंचोरे हे १५ एप्रिल रोजी सायंकाळी घर गाठले. त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात प्रवेश करताच, त्यांना कपाटातून अज्ञात चोरट्यांनी सामान काढून अस्ताव्यस्त फेकलेले पहायला मिळाले, तर कपाटातील दोन हजार रुपयांची रोकड आणि चार हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू असा एकूण सहा हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. अखरे गुरुवारी सायंकाळी योगराज चिंचोरे यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहेत.

Web Title: Thieves in a locked house in Lilavati apartment