चोरीच्या १२ मोबाईल व दुचाकीसह चोरट्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:42 PM2020-02-19T12:42:15+5:302020-02-19T12:42:58+5:30

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

Thief arrested along with two mobile phones and two burglaries | चोरीच्या १२ मोबाईल व दुचाकीसह चोरट्याला अटक

चोरीच्या १२ मोबाईल व दुचाकीसह चोरट्याला अटक

Next

जळगाव : मोबाईल व दुचाकी चोरीत अट्टल गुन्हेगार असलेल्या अब्बु उर्फ अबुल कलाम शेख रशीद (१९, रा.रामनगर, मेहरुण) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे १२ मोबाईल व एक दुचाकी हस्तगत केली आहे.
अविनाश रवींद्र पाटील (४१, रा. शिवाजी नगर) यांच्या मालकीची दुचाकी ४ डिसेंबर २०१९ रोजी चोरी झाली होती. या गुन्ह्याचा तपास सुरु असताना विजय पाटील यांना ही दुचाकी अब्बु उर्फ अबुल याने चोरुन ती वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार विजय पाटील व किशोर पाटील यांनी अब्बु याची माहिती काढून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याने चोरलेली दुचाकीसह १२ मोबाईल काढून दिले. त्याच्याकडून आणखी दुचाकी व मोबाईल हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तपासासाठी पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी सहाय्यक फौजदार रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, विजय पाटील, किशोर पाटील, महेंद्र गायकवाड,सचिन पाटील व असीम तडवी यांचे पथक नेमले होते. दरम्यान, संशयिंत अब्बु याला न्या.अक्षी जैन यांनी २० पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.गिरीश बारगजे यांनी काम पाहिले.

Web Title: Thief arrested along with two mobile phones and two burglaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव