बोदर्डे दूध सोसायटीमध्ये चोरी

By Admin | Updated: June 17, 2017 12:21 IST2017-06-17T12:21:06+5:302017-06-17T12:21:06+5:30

कार्यालय बंद असल्याने चोरटय़ांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला

Theft in the Bondara Milk Society | बोदर्डे दूध सोसायटीमध्ये चोरी

बोदर्डे दूध सोसायटीमध्ये चोरी

ऑनलाईन लोकमत

बोदर्डे, जि. जळगाव, दि. 17 - भडगाव  तालुक्यातील बोदर्डे  येथील दूध सोसायटीमध्ये शुक्रवारी रात्री चोरटय़ांनी प्रवेश करून 20 ते 25 हजार रुपये लंपास केले. रात्रीच्या वेळी कार्यालय बंद असल्याने चोरटय़ांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. या वेळी त्यांनी कार्यालयातील साहित्य अस्ताव्यस्त करीत 20 ते 25 हजार रुपये लंपास केले. शनिवारी सकाळी हा प्रकार लक्षात आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून चोरटय़ांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Theft in the Bondara Milk Society