शहरातील समस्या दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST2021-06-29T04:12:03+5:302021-06-29T04:12:03+5:30

निवेदनानुसार कामांना येत्या पंधरा दिवसांत सुरुवात न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी सकाळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार ...

Take away that problem that holds them back | शहरातील समस्या दूर करा

शहरातील समस्या दूर करा

निवेदनानुसार कामांना येत्या पंधरा दिवसांत सुरुवात न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी सकाळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना हे निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, प्रभाग नंबर १५ मध्ये अनेक समस्या आहेत. मटन मार्केटजवळ २० स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय बिकट आहे. नाल्यावरील भिंत तुटलेली आहे. नाला सफाई झालेली नाही. तसेच रस्त्यांची कामे नाहीत. या भागात घंटागाडी नियमित येत नाही. या संदर्भात शहर काँग्रेस कमिटीने मागच्या पाच वर्षांपासून या समस्यांसाठी वारंवार निवेदने देऊनही कामे झाली नाहीत. त्यामुळे आता येत्या पंधरा दिवसांत ही कामे न झाल्यास या भागातील नागरिक रस्त्यावर येतील व आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मो. मुनव्वर खान, शहर अध्यक्ष सलीम गवळी, जकपाल सिंह गिल, शहर सचिव हमीद शेख, जानी गवळी उपस्थित होते.

--- २९/४

Web Title: Take away that problem that holds them back