सहा लिपिकांवर निलंबनाची कारवाई

By Admin | Updated: January 14, 2015 15:13 IST2015-01-14T15:13:01+5:302015-01-14T15:13:01+5:30

महापालिकेच्या वसुली विभागात बदली करण्यात आलेले सहा लिपिक हजर न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त के.व्ही. धनाड यांनी दिले आहेत.

Suspension proceedings on six clerks | सहा लिपिकांवर निलंबनाची कारवाई

सहा लिपिकांवर निलंबनाची कारवाई

धुळे : महापालिकेच्या वसुली विभागात बदली करण्यात आलेले सहा लिपिक हजर न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त के.व्ही. धनाड यांनी दिले आहेत. 
कार्यालयीन कामकाजाच्या सोयीसाठी व वसुलीची उद्दिष्ट्ये साध्य करण्याकरिता सुरेश ढोले, प्रवीण कापडे, दिनेश पिंगळे, सुरेश वाडिले, अनिस शेख, नविद बेग यांची वसुली विभागात बदली करण्यात आली होती. परंतु हे कर्मचारी वसुली विभागात हजर झाले नाहीत. त्यामुळे वसुलीच्या कामात अडचणी निर्माण झाल्याने प्रभारी आयुक्त धनाड यांनी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आदेश घेऊन बदलीच्या ठिकाणी हजर न होणे ही बाब कार्यालयीन शिस्तीच्या विरूद्ध व वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणारी आहे. त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ५६ (२) अन्वये कारवाई करण्यातआली.

Web Title: Suspension proceedings on six clerks