जळगाव : कर्तव्यात हयगय केल्याने जिल्हा दूध संघातील तीन कर्मचा:यांना निलंबित करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या वृत्तास दूध संघाच्या सूत्रांनी दुजोरा दिला आहे. दूध संघातील या तीन कर्मचा:यांनी गैरव्यवहार केल्याचा संशय होता. चौकशीनंतर कारवाई गैरव्यवहारासंदर्भात झालेल्या चौकशीत तथ्य आढळून आल्याने तिघांना निलंबित केले. कार्यकारी संचालक मनोज लिमये यांना विचारले असता, ते म्हणाल,े ही अंतर्गत बाब आहे. याबाबत काहीही सांगू शकत नाही. चेअरमन मंदाकिनी खडसे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}