शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता दुरुस्तीसाठी ठिय्या आंदोलन

By admin | Updated: January 11, 2017 00:47 IST

तीन कि.मी. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी वाघोदा व सावदा येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामोर ठिय्या आंदोलन

सावदा/वाघोदा : सावदा ते वाघोदा या तीन कि.मी. रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी वाघोदा व सावदा येथील रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामोर ठिय्या आंदोलन करून प्रशानाला जाब विचारला त्यामुळे बांधकाम विभागाच्या येथील प्रशासनांमध्ये मोठी खळबळ उडाली. अखेर नमते घेत संबंधित विभागाच्या अधिका:यांनी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत आश्वासन दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.वाघोदा-सावदा या रस्त्याची  दुरवस्था झाली आहे. यामुळे या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. यात काही जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. या रस्त्याचे दुरुस्तीबाबत अनेक वेळा निवेदनेदेखील देण्यात आली मात्र संबंधित ठेकेदार  काम सुरू करीत नव्हता रस्त्याचे काम अपूर्ण होते त्यामुळे वाघोदा व सावदा परिसरातील नागरिकांनी याबाबत 10 रोजी सकाळी 11 वा सावदा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.  रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली वेळोवेळी निवदने देऊनसुद्धा काम सुरू होत नाही. सुमारे नऊ महिन्यांपासून हे काम रखडलेले आहे. अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. राजकीय दबाव असल्याने हे काम सुरू केले जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एन.पाटील, शाखा अभियंता रवींद्र बाविस्कर यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली.  त्यांनी वाघोदा रस्त्याचे 955 मीटरचे जे काम मजूर आहे त्याचे काही काम झाले आहे मात्र कव्हर कोटिंग बाकी आहे यासाठी ठेकेदारास पत्र दिले आहे. येत्या दोन दिवसात  तो  काम सुरू करणार असल्याचे सांगितले.  निवेदन स्वीकारले. मात्र यानंतर देखील आंदोलकानी सावदा -यावल, सावदा-भुसावळ, वाघोद्याच्या पुढे रावेरपयर्ंत रस्ता होतो, मात्र राजकीय अनास्थेमुळे   रस्ता होत नसल्याचा आरोपदेखील या वेळी   केला. कोचूर येथील नागरिकांनी सावदा कोचूर रस्तादेखील दुरुस्तीची मागणी केली.ठेकेदारास भ्रमणध्वनीव्दारे संपर्क यावेळी आंदोलकांनी अधिका:यांसमोरच   ठेकेदारास भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधला. यावेळी आंदोलकांनी वाघोदा रस्त्याचे काम बंद करून दुस:या रस्त्याचे काम कसे सुरू केले असा प्रश्न विचारला. शिवाय  सावदा-वाघोदा रस्त्याचे काम केव्हा सुरू करणार असा सवालदेखील केला यावेळी फोनचा स्पीकर सुरू होता त्यावेळी ठेकेदाराने वाघोदा रस्त्याचे काम बंद करून दुस:या रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी यांनी अगोदर त्या रस्त्याचे काम करावे, असे सांगितल्याने ते सुरू केले. दोन दिवसात वाघोदा रस्त्याचे काम सुरू करतो, असे सांगितले.  (वार्ताहर)