भुसावळातील ‘ती’ बेवारस बॅग गेली होती चोरीला

By Admin | Updated: June 16, 2017 12:38 IST2017-06-16T12:38:51+5:302017-06-16T12:38:51+5:30

लोहमार्ग पोलिसांकडून चोरीचा गुन्हा दाखल.

The stolen 'she' had been stolen for a non-bailable bag | भुसावळातील ‘ती’ बेवारस बॅग गेली होती चोरीला

भुसावळातील ‘ती’ बेवारस बॅग गेली होती चोरीला

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.16 : रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर आढळलेल्या बेवारस बॅगेत तब्बल 80 गॅ्रम वजनाचे दागिने लोहमार्ग पोलिसांना मिळाले होत़े पोलिसांनी बॅगेतील आधारकार्डावरून मुळ तक्रारदाराचा शोध लावल्यानंतर चोरटय़ांनी बॅग लांबवल्याचे निष्पन्न झाले असून त्यातून 37 हजारांचे सोने चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आह़े 
शशी अरविंद गुप्ता (डहाणू पश्चिम) या  बुधवारी कुटुंबासह अप पुष्पक एक्स्प्रेसने कानपूर-ठाणे प्रवास करीत असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर आल्यानंतर चोरटय़ांनी त्यांची बॅग लांबवली होती. चोरटय़ाने बॅगेतील तीन हजारांच्या रोकडसह सुमारे 37 हजारांचे दागिने लांबवत बॅग रेल्वे स्थानकावर फेकून दिली होती.
दरम्यान, चोरटय़ाने रेल्वे प्लॅटफार्मवर बॅग का फेकली तसेच अन्य दागिने बॅगेत राहिले कसे तसेच नेमकी चोरी केव्हा व कोठे झाली याबाबची सखोल चौकशी सहाय्यक निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील यांच्याकडून तक्रारदाराची शुक्रवारी दुपार्पयत सुरू असल्याने नेमका तपशील बाहेर आला नाही़ बॅग चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची पोलीस सूत्रांनी सांगितल़े  

Web Title: The stolen 'she' had been stolen for a non-bailable bag